शहादामध्ये भीषण अपघात, कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या राज्य अध्यक्षांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:51 IST2019-05-25T15:36:55+5:302019-05-25T15:51:06+5:30
शहादा - खेतीया रस्त्यांवरील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार पलटून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख यांचा मृत्यू झाला आहे.

शहादामध्ये भीषण अपघात, कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या राज्य अध्यक्षांचा मृत्यू
नंदुरबार - शहादा - खेतीया रस्त्यांवरील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार पलटून कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल देशमुख, रा.पिंपळगाव हरेश्वर, जि.जळगाव यांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
दोंडाईचा येथून आपल्या बहीण, पाहुणे, आई, भाच्यासोबत मध्य प्रदेश येथील सक्राळी येथे नातेवाईकांकडे प्रा. देशमुख हे आपल्या कार क्रमांक एम. एच १८ .ए. जे ५४६६ ने जात असताना शहादा तालुक्यातील लोणखेडा जवळील मयूर पेट्रोल पंप जवळ अचानक रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कार पलटी झाली.
अपघातात अनिल रजेसिंग देशमुख (वय ५०) रा.हरेश्वर पिंपळगाव हे जागीच ठार झाले. तर उर्मिला अनिल देशमुख (वय ४३), भार्गव अनिल देशमुख (वय १८) रा.हरेश्वर पिंपळगाव, हरबाबाई भटेसिंग राऊळ(वय ६०) ,कार चालक कुलदीप भटेसिंग राऊळ (वय ३६) ,रा. दोंडाईचा हे गंभीर जखमी झाले.जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी बबन कोळी, प्रविण लोहार, सुधीर पाटील, रोहित कोळी, सुकलाल चौधरी ,जमादार सर आदी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत तात्काळ शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.