शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार मजूर रेल्वेने जिल्ह्यात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजार आदिवासी मजूर श्रमिक एक्सप्रेसने नंदुरबारला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजार आदिवासी मजूर श्रमिक एक्सप्रेसने नंदुरबारला परतले. या मजुरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या ५२ बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.या वेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर. तडवी, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजुरांकडून आपल्या मूळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्या सर्व मजुरांना आणण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यासंदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वेस्थानकावर पोहोचले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता जुनागढ येथून विशेष श्रमिक एक्सप्रेसने सर्व मजूर निघाले आणि गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता नंदुरबार रेल्वेस्थानकावर पोहोचले. रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर १० डॉक्टर व १० आरोग्य सेवकामार्फत बोगीनुसार प्रत्येक मजुरांचे थॅर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारुन त्यांची नोंद घेण्यात आली. सर्व मजुरांना तालुकानिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ५२ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. मूळगावी परल्यानंतर सर्व मजुरांना त्यांच्या घरी १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गुजरातमधून आलेल्या प्रवाशांमध्ये अक्कलकुवा २७, तळोदा २५३, धडगाव २२, नंदुरबार ८०, नवापूर सात व शहाद्यातील एक हजार १०१ असे नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ४९० प्रवासी होते. तर शिरपूर येथील १० मजूरही याच रेल्वेने परतले. मजुरांच्या तिकीटाचा खर्च सहा लाख ३७ हजार ५०० रुपये न्यूक्लिअस बजेटमधून करण्यात आला आणि त्याची रक्कम जुनागढ प्रशासनाला देण्यात आली होती.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील सरिता ठाकरे महिलेने बुधवारी रात्री श्रमिक एक्सप्रेसमध्ये एका कन्येला जन्म दिला. या महिलेला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून तिला मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहे. बाळासह आपल्या गावी जाण्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.जिल्ह्यात सुखरुप पोहचलेल्या मजुरांच्या चेहºयावर आनंद दिसत होता. त्या सर्वांनी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, शासन व प्रशासनाचे आभार मानले.

राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना परत आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करण्याच्या सूचना प्रकल्प कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दीड हजार मजूर आपल्या गावी पोहोचले याचे समाधान आहे. जिल्ह्यातील इतरही नागरिकांना परत गावी यायचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.-अ‍ॅड.के.सी. पाडवी, पालकमंत्री.