शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रही त्यात मागे नसल्याने राज्य सरकारने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांची ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. महाराष्ट्रही त्यात मागे नसल्याने राज्य सरकारने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांची संचारबंदी लावली आहे. सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने नागरिक धास्तावले असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अति गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनीही लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना शहादा शहरात मात्र लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड सोबतच पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती काही लसीकरण केंद्रावर केली जात असल्याची ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे. ज्या केंद्रावर पहिला डोस घेतला त्याच केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्डसोबतच पॅन कार्ड किंवा मतदान कार्डची मागणी करण्यात येत आहे. पहिला डोस देताना फक्त आधार कार्ड लागल्याने नागरिक आधार कार्ड सोबत घेऊन जात आहेत. मात्र लसीकरण केंद्रावर पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड नसेल तर परत पाठवले जात आहे. खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास . शिवाय अनेक नागरिकांकडे पॅनकार्ड नसल्याने ते लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लसीकरणाचे केंद्र वाढवून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याची आवश्यकता असताना पॅनकार्ड किंवा मतदान कार्डची सक्ती कशासाठी? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. काही केंद्रांवर अजूनही केवळ आधार कार्ड घेऊन लसीकरण केले जात असताना काही केंद्रांवर पॅनकार्डबाबत अडवणूक का करण्यात येत आहे? याबाबत नक्की शासनाचे काय आदेश आहेत, हे प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. तसेच कोरोना लसीचा डोस देताना आधार कार्डव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.