शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता डाॅक्टरांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, सिकलसेल, यासारखे गंभीर आजारांचे प्रश्न असताना, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र खिळखिळी आहे. आरोग्याच्या प्रश्नावरच गेल्या चार ...

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, सिकलसेल, यासारखे गंभीर आजारांचे प्रश्न असताना, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र खिळखिळी आहे. आरोग्याच्या प्रश्नावरच गेल्या चार दशकात पाच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन दुर्गम भागात अश्रू गाळले, पण त्या अश्रुंची फुले झाली नाहीत. अनेक योजनांची घोषणा झाली. निधीची घोषणा झाली, पण ते सर्व हवेतच विरले. जेव्हा कोरोनाचा संसर्ग आला, तेव्हा आरोग्य यंत्रणेची कमतरता प्रकर्षाने जाणवली, पण त्याही परिस्थितीत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन आणि लोक प्रतिनिधींनी एक-एक सोईसुविधांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रयत्न केला. जिल्ह्यात साधी कोरोनाच्या चाचणीसाठी लॅब नव्हती. दुसऱ्या जिल्ह्यावर त्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. ही लॅब आली. त्याचा विस्तारही झाला. नवीन रुग्णवाहिका शववाहिका व दुर्गम अतिदुर्गम भागात ॲम्बुलन्सच्या समस्येवर बाईक ॲम्बुलन्स आल्या. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट आला. त्याचा विस्तारही सुरू आहे. केवळ ५० ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या शासकीय रुग्णालयांमधील बेडचा विस्तार ४५० पर्यंत झाला आहे. अजूनही विस्तार सुरू आहे. विलगीकरणासाठी सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक बेडची सुविधा झाली. त्यामुळे आता कुठल्याही रुग्णाची बेड मिळत नसल्याची तक्रार येणार नाही, असा जिल्हाधिकारी यांनी विश्वासही व्यक्त केला. हा त्यांचा विश्वास निश्चितच जिल्ह्यातील जनतेला दिलासा देणारा असला, तरी रुग्णसेवेसाठी मात्र डाॅक्टर आणि परिचारिकांची आवश्यकता लागणार आहे, हे विसरून चालणार नाही. आधीच जिल्ह्यात रिक्तपदांची संख्या मोठी आहे. जिल्हा रुग्णालयात १४ वर्ग एकचे डाॅक्टर नाहीत. आरोग्य विभागात ४१७ पदांसह तीन वर्ग एकचे अधिकारी नाहीत, याशिवाय स्वतंत्र कोविड रुग्णालयासाठी भरती काढूनही डाॅक्टर मिळत नाहीत. अनेक पदे अजूनही रिक्त आहेत. अशा स्थितीत स्पेशलिस्ट डाॅक्टरांसह कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डाॅक्टर आणि परिचारिकांची पदे भरण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू झाले आहे. या महाविद्यालयासाठी तज्ज्ञ वैद्यकीय प्राध्यापकांची नियुक्ती झाली आहे. सध्या कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे या डाॅक्टरांचाही व त्यांच्या ज्ञानाचा वापर जिल्ह्यातील कोरोना हरविण्यासाठी झाला पाहिजे.