शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

आता अक्कलकुव्यातही होणार मशरूमची सेंद्रीय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:08 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा :  तालुक्यातील सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून राजेंद्र वसावे यांनी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा :  तालुक्यातील सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करून राजेंद्र वसावे यांनी यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह भाजीपाला व मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पारंपारिक असलेला खपली व बन्सी  गहूचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडयासह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना राजेंद्र वसावे मार्गदर्शन करीत आहेत.  त्यांच्यामुळे सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सेंद्रीय शेतीकडे आकृष्ट होत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून अन्नधान्य तसेच भाजीपाल्याची निर्मिती सुरू केली असून, त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदादेखील झाला आहे. रब्बी हंगामात सातपुड्यासह नंदुरबार जिल्ह्यात तसेच परराज्यातही सेंद्रीय शेतीसाठी पारंपरिक बियाण्यांची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः पारंपारिक आणि आरोग्याला पोषक असलेले सेंद्रीय पद्धतीने तयार  केलेला खपली गहू त्यांनी जिल्ह्यामध्ये विक्री  केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे उपलब्धतेनुसार त्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र या खपली गहूची मागणी जास्त असल्या कारणामुळे ती पूर्ण करता येऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.  यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या खपली गव्हाचे बियाण्यांबाबत मार्गदर्शन करणार असल्याचेही राजेंद्र वसावे यांनी सांगितले.

रब्बी हंगामात सेंद्रीय शेती करू इच्छिणार्‍या शेतकऱ्यांसाठी पारंपारिक खपली तसेच बन्सी गव्हाचे लागवडीबाबत व उत्पादनाबाबत पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचे शेतकरी वसावे यांनी सांगितले. सर्व पारंपारिक कडधान्याच्या बियाण्यांबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.  तसेच सेंद्रीय शेतीतून उत्पादीत झालेले धान्य व भाजीपाला विक्रीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक फायदा करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सद्य:स्थितीत अक्कलकुवा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये  सेंद्रीय बियाणे व खतांच्या नावावर अनेक बनावट कंपन्या व त्यांचे वितरक गावोगावी वेगवेगळे आमिषे दाखवून शेतकऱ्यांची व तरुणांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यापासून सावध राह

खपली गहू हा पारंपारिक असून,  शरीरातील अनेक विकारांना घालवणारा आहे. शरीरातील अनेक अवयवांना मजबूत करण्याचे कार्य याच्या सेवनातून होते. दुर्मिळ असलेल्या या गव्हाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.  

     - भगतसिंग पाडवी,     निवृत्त विक्रीकर अधिकारी