आता जलयुक्त शिवार अभियान - 2 जिल्ह्यात राबविणार; पहिल्या टप्प्यात 85 गावांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:53 PM2023-03-30T12:53:50+5:302023-03-30T12:55:31+5:30

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 85 गावांची निवड करण्यात येणार असून या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

Now Jalyukta Shivar Abhiyaan - will be implemented in 2 Nandurbar districts; Selection of 85 villages in the first phase | आता जलयुक्त शिवार अभियान - 2 जिल्ह्यात राबविणार; पहिल्या टप्प्यात 85 गावांची निवड 

आता जलयुक्त शिवार अभियान - 2 जिल्ह्यात राबविणार; पहिल्या टप्प्यात 85 गावांची निवड 

googlenewsNext

- रमाकांत पाटील 

नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियान 1  राबविल्यानंतर आता जिल्ह्यातील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2 हे अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 85 गावांची निवड करण्यात येणार असून या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

पिकाच्या ऐनवाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. जिल्ह्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषि क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2015-16 ते 2018-19 या कालावधीत राबविण्यात आली होती. 

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान 1 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 423 गावात एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधीत विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरित्या अंमलबजावणी करुन जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करुन शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण झाली आहे. 

आता जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 85 गावांत हे अभियान राबविण्यात येणार असून त्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 20 गावे, नवापूर 6, शहादा 14, तळोदा 9, अक्राणी 17 तर अक्कलकुवा 19 अशा प्रकारे 85गावांचा समावेश असणार आहे.

Web Title: Now Jalyukta Shivar Abhiyaan - will be implemented in 2 Nandurbar districts; Selection of 85 villages in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.