शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

१०० वर्षात प्रथमच कोरडी पडली तळोदा तालुक्यात वाहणारी निझरा नदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यात वाहणारी सर्वाधिक वेगवान अशा निझरा नदीला साडेचारशे वर्षात प्रथमच पाणी आलेले नाही़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यात वाहणारी सर्वाधिक वेगवान अशा निझरा नदीला साडेचारशे वर्षात प्रथमच पाणी आलेले नाही़ नदीवर बांधलेल्या धनपूर धरण प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने नदीचे पात्र प्रथमच कोरडे पडले आहे़
तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात झऱ्यातून प्रवाहित होणारी निझरा नदी छोटा धनपूर ते मोड यादरम्यान विस्तीर्ण होते़ रूंदावलेल्या पात्रात पावसाळ्याचे चार महिने नदीचे पाणी पूर्वी खळाळून वाहत असे़ दरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वी नदीवर धनपूर गावाजवळ मध्यम प्रकल्पाची उभारणी जलसंपदा विभागाकडून करण्यात आली़ गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे धरण जुलै महिन्यात भरून आॅगस्ट महिन्यात नदीला पूर आला होता़ यंदा मात्र पावसाने सुरूवातीच्या काळात दमदार हजेरी न दिल्याने धरणातील साठ्यात वाढ झाली नव्हती़ सध्या तालुक्यात संततधार पाऊस सुरू असला तरी धरण अद्याप भरलेले नाही़ यातून नदी पात्रात पाणी आलेले नसल्याने नदी कोरडी ठाक पडली आहे़ साडेचारशे वर्षात प्रथमच असा प्रसंग आल्याची माहिती मोड ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे़ दरम्यान धनपूर धरणाची क्षमता ३़१८ दशलक्ष घनमीटर आहे़ तूर्तास धरणात केवळ २़२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे़ या साठ्यात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ हे धरण भरल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे़ निझरा नदी हे मोड व परिसरातील गावांचा प्रमुख जलस्त्रोत आहे़ नदीच्या पात्रात जमा होणाºया पाण्यामुळे काठावरच्या विहिरी आणि इतर स्त्रोतांमध्ये भूजल पातळीत वाढ होते़ परंतु नदी कोरडी असल्याने चिंता व्यक्त होत आहे़
धनपूर धरणातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी पाटचाºयांची निर्मिती करण्यात आलेली नाही़ यातून सिंंचनाचा प्रश्न अपूर्ण आहे़ नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता शिंदे यांनी धरण लवकरात लवकर भरणार असल्याचे म्हटले असून त्यानंतर नदीपात्रात पाणी येणार असल्याचे म्हटले आहे़