शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात नऊ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दोन दुकानांमधून एलसीबीने नऊ हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील दोन दुकानांमधून एलसीबीने नऊ हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून नॉयलॉन मांजा विक्री रोखण्याची मागणी होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बंदी देखील घातली आहे.विक्रेते आनंद गोपाळ जयस्वाल व सनी अशोककुमार तेजवानी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पतंगोत्सवात मोठ्या प्रमाणावर नॉयलॉनचा मांजाचा वापर केला जातो. या मांजामुळे अनेकजण जायबंदी होत असतात. शिवाय पक्ष्यांना देखील ईजा होत असते. त्यामुळे नॉयलॉन मांजावर बंदी घालावी अशी मागणी दरवर्षी करण्यात येते. असा मांजा विक्रीवर १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी देखील घातली आहे. असे असतांनाही काही विक्रेते त्याची विक्री करीत आहेत.अशा विक्रेत्यांविरुद्ध एलसीबीने थेट कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना दोन ठिकाणी नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. जळका बाजारात आनंद गोपाल जयस्वाल यांच्या दुकानासमोरील ओट्यावर विक्री होणारा ३२०० रुपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला. तसेच मंगळ बाजारातील सनी अशोककुमार तेजवाणी यांच्या दुकानातूनही ५८०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.दोघांना ताब्यात घेवून शहर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.