संदीप वळवी, दशरथ वसावे, रोहिदास पाडवी वीरजी वळवी सर्व राहणार दुधवे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वन विभागाला दुधवे येथे चार घरांमध्ये अवैध सागवानी लाकडाचा साठा असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे रविवारी दुपारी पथकाने गावात धाड टाकली. चार घरांमध्ये तपासणी केली असता तेथे लाकडी फर्निचर बनविण्याचे साहित्य व सागवानी व सिसम जातीचे लाकूड आढळून आले. त्यात साग नग ४४८, सिसम नग १०, सोफा, पलंग असे एकूण अंदाजे आठ घनमीटर लाकूड आढळले याशिवाय फर्निचर तयार करण्यासाठी लागणारे मशीन फिनिश टिंबर व एक रंधा मशीन मिळाल्या. या सर्व मुद्देमालाची किंमत नऊ लाख रुपये असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. सहायक वन संरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल आर.बी .पवार, वनपाल डी.के.जाधव, विजय तेले, युवराज भाबड, एस एन पाटील, पी डी पवार, आरती नगराळे यांनी ही कारवाई केली.
दुधवे येथील धाडीत साग व सिसम लाकूडसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त, चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST
संदीप वळवी, दशरथ वसावे, रोहिदास पाडवी वीरजी वळवी सर्व राहणार दुधवे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वन ...
दुधवे येथील धाडीत साग व सिसम लाकूडसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त, चौघे ताब्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}