शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निलांती ऐबेगुणरत्ने यांना लागला श्री चक्रधर स्वामींचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:43 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केवळ व्हाटस्अपवरील संवादातून भगवान श्री चक्रधर स्वामी यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केवळ व्हाटस्अपवरील संवादातून भगवान श्री चक्रधर स्वामी यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विचारांच्या शोधासाठी थेट भारतात येऊन महानुभाव पंथ स्विकारणाऱ्या श्रीलंकेचे माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण ऐबेगुणरत्ने यांच्या पत्नी निलांती ऐबेगुणरत्ने ह्या अक्षरश: भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडल्या आहेत. वर्षभरात त्यांनी भारतात दोनवेळा भेटी देऊन महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानावर भेट देऊन ते विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.श्रीलंका या देशात आजही रामायणातील अनेक संदर्भस्थाने आहेत. याच देशात सीतेचे मंदिरही आहे. त्याठिकाणी दरवर्षी रामकथा होतात. या देशात अनेक शाळा-महाविद्यालयात महात्मा गांधी जयंतीही साजरा होते. अर्थात भारतीय परंपरेतील अनेक संदर्भ या देशाशी जुळले असले तरी तेथील संस्कृती मात्र वेगळी आहे. याच देशातील माजी आरोग्यमंत्री लक्ष्मण ऐबेगुणरत्ने यांच्या पत्नी निलांती ह्या आपल्या पतीचा आॅप्टीकलचा व्यवसाय सांभाळतात. श्रीलंकेत ५० पेक्षा अधिक ठिकाणी त्यांच्या व्यवसायाच्या शाखा आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच त्या व्हाट्सअपच्या माध्यमातून पुण्यातील पवन नावाच्या तरुणाशी संपर्क आला. व्हाट्सअपच्या संवादातून काही अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. तेव्हा पवनने महानुभाव पंथाबाबत माहिती दिली. या पंथाचे सध्याचे जाधववाडी, जि.पुणे येथील मोठेबाबा नरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर यांचीही माहिती देऊन त्यांचा फोटो पाठविला. हा फोटो पाहून त्या प्रभावीत झाल्या आणि थेट त्यांना भेटण्यासाठी भारतात आल्या. येथे आल्यानंतर त्यांनी महानुभाव पंथाची माहिती घेतली. त्याबाबत त्या अधिक आकर्षित झाल्या. त्यावेळी नरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर यांच्या वाकी, जि.अमरावती येथे प्रवचन सुरू होते. तेथेच त्यांची भेट घेऊन निलांती ऐबेगुणरत्ने यांनी त्यांच्याकडून उपदेश घेतला व महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. बाबांनी त्यांचे सांप्रदायिक नाव ‘कृष्णप्रिया’ असे ठेवले आहे.दरम्यान, महानुभाव पंथ स्वीकारल्यानंतर कृष्णप्रिया अर्थात निलांती ह्या दोनवेळा भारतात येऊन गेल्या. सध्याही त्या भारतात आहेत. येथील महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांवर भेट देऊन सर्व माहिती व श्री चक्रधर स्वामींचे विचारही जाणून घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही समशेरपूर येथील श्रीकृष्ण मंदिर व सारंगखेडा येथील दत्त मंदिरावर त्यांनी भेटी दिल्या आहेत.