शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजरंग-महाआघाडीच्या पक्षांना नवीन वर्ष उत्सुकतेचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:34 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सध्या राजकारणातील अंतर्गत हालचाली गतीमान झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात नेते ‘क्वारंटाईन’ होऊन ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या राजकारणातील अंतर्गत हालचाली गतीमान झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात नेते ‘क्वारंटाईन’ होऊन आराम करीत असल्याने बसल्या बसल्या राजकारणातील डावपेच गुपीतपणे सुरू आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये केवळ चर्चा रंगत असूृन सर्वांचेच लक्ष नव्या घडामोडींकडे लागले आहे. विशेषत: काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी थांबल्याने त्याकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता लागून आहे.सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये खरे तर नेत्यांना फारसा रस दिसून येत नाही. पण राज्यातील आघाडी सरकार टिकणार की जाणार या घडामोडींकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवत आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये काही मुद्यांवर तिन्ही पक्षांचे एकमत नाही. तोच धागा पकडत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. सध्या औरंगाबादचे नामकरणाच्या मुद्याची चर्चा जोर धरत असून त्यावरुन पक्षातील मतभेदांमुळे थेट मध्यावधी निवडणुकांपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यातच राज्यपाल नियुक्त आमदारांची थांबलेली नियुक्ती, शरद पवारांचा संभाव्य दौरा आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची लांबलेली निवड हे मुद्दे मात्र राजकारणातील चर्चेचे वातावरण अधिक गरम करीत आहे.राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये नंदुरबारचे शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आहे. रघुवंशी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही जिल्ह्यात अधिक आहे. तेवढाच राजकीय विरोधदेखील आहे. त्यामुळे  दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही राज्यपालांनी अधिकृतपणे नावे घोषित न केल्याने समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तर विरोधी कार्यकर्ते मात्र वेगवेगळ्या चर्चेने संभ्रम निर्माण करीत आहेत. याच यादीत नंदुरबारशी नातेसंबंध असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचेही नाव असल्याने त्या चर्चेत अधिक भर पडत आहे. त्यामुळे राज्यपाल अधिकृत यादी कधी घोषित करतात त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र स्थानिक कार्यकर्ते पक्ष बांधणीला जोर देत आहेत. विविध आंदोलन व कार्यक्रमांमध्ये या पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रीय होताना दिसत आहेत. पण या उत्साहात पक्षाचे नेते शरद पवार यांचा स्थगित दौरा कधी होईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार यांच्या गेल्या २१ नोव्हेंबरला नंदुरबार जिल्हा दौरा जाहीर झाला होता. या दौऱ्यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावपातळीवर प्रचार करून कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे त्याच काळात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे भाकीतही करण्यात आले होते. त्यामुळे हा दौरा अधिक लक्षवेधी ठरला होता. मात्र तो ऐनवेळी स्थगित झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये हिरमोड आला होता. त्यामुळे दौरा पुढे होणार असल्याचे जाहीर केले होते. आता सर्वांचे लक्ष या संभाव्य दौऱ्याकडे आहे. एकीकडे राज्यातील आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही उत्सुकता असताना काँग्रेसला मात्र आपल्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्तीची उत्सुकता आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर मात्र सव्वा वर्षापासून हे पद रिक्तच आहे. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी मध्यंतरी इतर पदांची नियुक्ती केली. पण जिल्हाध्यक्षपदी मात्र कुणाचीही नियुक्ती न झाल्याने या पदावर कोणाची वर्णी लागेल याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. एकूणच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.