शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँका पाच टक्क्यावरच थांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवितरण सोमवारपासून केवळ पाच टक्क्यांवर अडले आहे़ राष्ट्रीयकृत, ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवितरण सोमवारपासून केवळ पाच टक्क्यांवर अडले आहे़ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांनी मिळून हे पाच टक्के कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे़ या कर्जवाटपाला गतीच येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकाच्या किमान ६० शाखांमधून ५७१ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे़ ग्रामीण बँकांकडून किमान १६ कोटी ६४ लाख तर खाजगी बँकांनी १० कोटी ५७ लाख रुपयांच पीक कर्ज वाटप करण्याचे निर्धारित आहे़ परंतू आजअखेरीस या सर्व बँकांनी मिळून १ हजार ८९५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे़ यात खाजगी बँकांनी सर्वाधिक वाटा उचलला असून त्यांनी १२ टक्के शेतकºयांपर्यंत कर्ज पोहोचते केले आहे़ ग्रामीण बँकांची स्थिती अद्यापही चांगली नसल्याचे तर राष्ट्रीयकृत बँका पूर्णपणे ढेपाळल्या असल्याचे समोर आले आहे़या सर्व प्रकाराला कर्जमुक्ती योजना कारणीभूत असल्याचे सांगून बँका अंग झाडत असल्या तरीही दरवर्षी राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत शेतकºयांना फिरवाफिरव करण्याची जुनी पद्धत आहे़ मागील वर्षाचा बोजा कमी करणे, कागदपत्रे अपडेशन यातच वेळ घालवण्यात येत आहे़ बँकांना अद्यापही रिझर्व्ह बँकेचे शेतकºयांना सरसकट कर्ज वाटपाच्या सूचना आलेल्या नसल्याने प्रशासनाने बँकांसोबत बैठक घेऊन कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे़राष्ट्रीयकृत बॅकांमधून १ हजार ५६६ शेतकºयांना २२ कोटी ३२ लाख रुपये, ग्रामीण बँकेतून केवळ ८१ शेतकºयांना ८ लाख ८ हजार तर खाजगी बँकांनी २४८ शेतकºयांना ९९ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज वाटप केल्याची समोर आली आहे़ खाजगी बॅकांचे नियम आणि अटी शर्ती ह्या वेगळ्या असल्याने त्यांच्याकडून कर्जाची पूर्तता तातडीने होत असल्याने त्यांच्याकडून वर्षाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांना कर्ज देण्यात येते़ परंतू राष्ट्रीयकृत बँका निर्धारित उद्दीष्टापासून मागेच रहात असल्याने शेतकºयांना सावकारी कर्ज घ्यावे लागते़