शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेना यांचीच सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस-शिवसेना यांचीच सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपच्या कुमुदिनी गावीत यांनीही अर्ज दाखल केला होता, परंतु ऐनवेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा दिला. परंतु उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन भाजप उमेदवाराला २६ तर शिवसेना उमेदवाराला ३० मते मिळाली.जिल्हा परिषदेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. ५६ जागांमध्ये भाजपला २३, काँग्रेसला २३, शिवसेनेला ७ तर राष्टÑवादीला ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेत महत्त्व प्राप्त झाले होते. दुसरीकडे भाजप-राष्टÑवादीने एकत्रीत गट स्थापन केल्याने त्यांची संख्या २६ झाली होती. शिवसेनेने अखेर काँग्रेस सोबत जाण्याचे निश्चित केल्याने काँग्रेस-सेना यांची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन झाली.शेवटपर्यंत उत्कंठा असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी चार जणांनी अर्ज दाखल केले होते. माघारीअंती अध्यक्षपदासाठी भाजपच्या कुमुदिनी विजयकुमार गावीत व काँग्रेसच्या अ‍ॅड.सिमा पद्माकर वळवी यांचेच अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी तर भाजपतर्फे जयश्री दिपक पाटील यांचे अर्ज राहिले.प्रत्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या सर्व सदस्यांनी मतदान न घेता सिमा वळवी यांना पाठींबा असल्याचे जाहीर केल्याने त्यांना संपुर्ण ५६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेस व शिवसेना यांचे सर्वच अर्थात ३० मते अ‍ॅड.राम रघुवंनशी यांना तर भाजप-राष्टÑवादीची २६ मते जयश्री पाटील यांना मिळाल्याने अ‍ॅड.राम रघुवंशी यांना विजयी घोषीत करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व सहायक म्हणून सीईओ विनय गौडा होते.