शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार-मुंबई स्लिपरकोच शिवशाही अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या नंदुरबार-मुंबई स्लिपर कोच शिवशाही बसचा शुभारंभ येथील आगारात करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या नंदुरबार-मुंबई स्लिपर कोच शिवशाही बसचा शुभारंभ येथील आगारात करण्यात आला. नंदुरबारसाठी आता आसन आणि स्लिपर कोच अशा दोन्ही बसेस मुंबईसाठी उपलब्ध आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातर्फे नंदुरबार-मुंबई शिवशाही बसचा शुभारंभ ज्येष्ठ प्रवासी साक्री येथील भालचंद्र गोविंदा कोठावदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यापूर्वी केवळ परिवर्तन बस असलेल्या सेवेनंतर प्रवाशांच्या आग्रहास्तव आता दररोज सायंकाळी पावणेआठ वाजता नंदुरबार -मुंबई शिवशाही बस सुरू करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या हस्ते नवीन शिवशाही बसचे पूजन करण्यात आले.यावेळी नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, वाहतूक नियंत्रक प्रशांत गुजराती, सचिन पाटील, सहाय्यक वाहतूक नियंत्रक पी. के. अहिरे, वाहक रवींद्र बैरागी, चालक एम. एन. पिंजारी, नियमित प्रवासी सारंग ब्राह्मणकर आणि इतर प्रवासी उपस्थित होते. नाशिक मुंबई जाणाऱ्या प्रवाशांनी या नवीन बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, मुंबई व पुणेसाठी सायंकाळी प्रत्येकी दोन बसेस सुरू आहेत.