शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक सौरऊर्जा प्रकल्प राबविणारी नंदुरबार खान्देशातील पहिली पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या ...

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सौरऊर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबविणारी नंदुरबार नगर परिषद महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी मिळालेला असून, ९३९ किलोवॅटचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासून नंदुरबार नगर परिषदेची ऊर्जा बचतीसह आर्थिक बचत मागील तीन महिन्यांपासून होत आहे. हा प्रकल्प एकूण दहा साईट्सवर लावण्यात आलेला असून, झराळी वॉटर पंपिंग स्टेशन, झराळी वॉटर फिल्टर प्लांट, एस.टी.पी. प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. सध्या प्रकल्पामधून तयार होणाऱ्या वि‍जेतून महिन्याला सहा ते सात लाख रुपयांची बचत होत आहे. उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास या बचतीमुळे येणाऱ्या पाच ते सहा वर्षांत प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनो क्रिस्टलाईन सौरऊर्जा पॅनल लावण्यात आलेले आहेत. मोनो क्रिस्टलाईन सौरऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे एबीबी आणि फ्रॉनीयस या युरोपियन कंपन्यांचे इन्व्हर्टर वापरलेले आहेत. तसेच डीसी केबलिंग करताना फ्रॉगलिप आणि ऑप्टीमाईस्ड स्ट्रिंगिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या प्रकल्पात वापरण्यात आलेल्या आराखड्याचे स्टॅड विश्लेषण करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईन याची सांगड या प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार नगर परिषदेने घातली आहे व त्याचा परिणाम आतापर्यंत झालेल्या चांगल्या वीज उत्पादनातून दिसून येत आहे. या प्रकल्पातून नियमित वीज उत्पादन व्हावे यासाठी देखाभाल दुरुस्ती सुद्धा नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे. हा प्रकल्प अभूतपूर्व डिझाईनमुळे तंत्रशिक्षणातील तरुण विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, नागरिक यांना मार्गदर्शक ठरणार आहे. लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. नंदुरबार नगरपालिकेची पुढील २५ वर्षे वीजबचत तर होणार आहे.