नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात केवळ आठ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:41+5:302021-07-07T04:37:41+5:30

आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात १५.१०, नवापूर ५.९, शहादा १२.१. तळोदा ७.१, धडगाव ३.७, तर अक्कलकुवा तालुक्यात सरासरी ६.९ मिलिमीटर पावसाची ...

Nandurbar district received only eight millimeters of rain in June | नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात केवळ आठ मिलिमीटर पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात केवळ आठ मिलिमीटर पाऊस

आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात १५.१०, नवापूर ५.९, शहादा १२.१. तळोदा ७.१, धडगाव ३.७, तर अक्कलकुवा तालुक्यात सरासरी ६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षातील जून महिन्याचा आढावा घेतला असता, एकूण १५० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली होती, तर जून २०१९ मध्ये एकूण २०९ मिलिमीटर पाऊस झाला होता. जून २०२० या महिन्यात नंदुरबार तालुक्यात ७४, नवापूर ५८, शहादा १०८, तळोदा ८६, धडगाव ५७, तर अक्कलकुवा तालुक्यात ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परंतु यंदा सात ते ३० जून या काळात केवळ १.१ मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. सहा जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण आठ मिलिमीटर पाऊस झाला असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १०० टक्के पाऊस पडत असल्याने गेल्यावर्षापर्यंत शेतकरी समाधानी होते. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्यांनाही ब्रेक लागला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाऊस पाहून पेरणी केली जात असल्याने काही १० टक्के क्षेत्रातच दुबार पेरणीचे संकट आहे. जिल्ह्यात दोन लाख ८३ हजारपैकी केवळ ३५ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाल्याची माहिती आहे. यातही कापूस १७ हजार हेक्टरवर आहे. यामुळे ज्या शेतक-यांनी पेरा केला आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. येत्या काळात पाऊस पडल्यास शेतक-यांचे संकट टळेल, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाचे तंत्र अधिकारी वसंत चाैधरी यांनी दिली.

शेतक-यांनीही पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

Web Title: Nandurbar district received only eight millimeters of rain in June