नंदुरबार बाजारातही कांदा ठरला वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:08 IST2019-11-23T13:08:49+5:302019-11-23T13:08:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांद्याने विक्रमी दरांकडे कूच केली असून शुक्रवारी चांगल्या कांद्याला 4 ...

नंदुरबार बाजारातही कांदा ठरला वरचढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांद्याने विक्रमी दरांकडे कूच केली असून शुक्रवारी चांगल्या कांद्याला 4 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलर्पयत दर देण्यात आले आहेत़ कांद्याला मिळालेल्या या दरांमुळे किरकोळ बाजारात कांदा प्रती किलो 50 रुपयांच्या पार पोहोचला आह़े
नंदुरबार बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून कांदा टंचाई सुरु आह़े वेळोवेळी दरांमधील चढ उतारांमुळे शेतक:यांनी बाजारात कांदा आणणे टाळल्याने कांदा आवक नगण्य झाली होती़ यात गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा प्रतिक्विंटल सहा हजाराच्या पुढे गेला होता़ याचा परिणाम म्हणजे नंदुरबार बाजारात गेल्या दोन दिवसांपासून कांदा आवक वाढून दरांमध्ये वाढ झाली आह़े गुरुवारी साधारण 300 तर शुक्रवारी 500 क्विंटल कांदा आवक झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शुक्रवारी याठिकाणी नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल 3 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये दराने व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आले आह़े येत्या 15 दिवसांर्पयत कांदा बाजारात तेजीची स्थिती टिकून राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यामुळे नंदुरबारात येणारा कांदा हा महागडाच ठरणार आह़े बाजार समितीत कांद्याचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारात गुरुवार सायंकाळपासूनच प्रतीकिलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आह़े यातून किरकोळ विक्रेते प्रतिकिलो 60 रुपयांर्पयत कांदा विक्री करत होत़े