शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगाराने साडेचार हजार भक्तांना घडवले विठुरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या 4 हजार 761 भाविकांनी नंदुरबार आगाराच्या विशेष बससेवेचा लाभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या 4 हजार 761 भाविकांनी नंदुरबार आगाराच्या विशेष बससेवेचा लाभ घेतला़ नंदुरबार ते पंढरपूर असा 467 किलोमीटरच्या या प्रवासाला 22 बसेस देण्यात आल्या होत्या़ आषाढीनिमित्त राज्याच्या विविध भागातून पंढरपूरकडे निघणा:या वारक:यांच्या सोयीसाठी यंदाही विशेष बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळाने केली होती़ यात नंदुरबार आगारानेही हिरिरीने सहभाग घेत 22 बसेसची नियुक्ती केली होती़ या बसेसने 10 ते 15 जुलै या पाच दिवसात तब्बल 92 फे:या करुन भाविकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन घडवल़े नंदुरबार आगारातून सोडण्यात आलेल्या या बसेससाठी 22 वाहक आणि चालक यांची नियुक्ती करण्यात आली होती़ बसमध्ये येणा:या सवलतीच्या आणि विना सवलतीच्या प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करत पंढरपूर यात्रेला सुरुवात करणा:या चालक-वाहकांच्या परिश्रमातून पाच दिवसात 9 लाख 47 हजार 761 रुपयांची कमाई शक्य झाली आह़े प्रती किलोमीटर 30 रुपये प्रमाणे मिळालेल्या या रकमेमुळे नंदुरबार आगाराने धुळे विभागातून अव्वल स्थान मिळवल्याची माहिती देण्यात आली आह़े पाच दिवस सुरु असलेल्या या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या 22 बसेसची योग्य ती स्वच्छता आणि काळजी घेतली गेल्याने प्रवाशांनीही पसंती दिली होती़ विशेष करुन नंदुरबार शहर, तालुक्यासह लगतच्या गुजरात राज्यातील प्रवाशांनी बसेसमधून प्रवास केला होता़ या उपक्रमासाठी आगारप्रमुख मनोज पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले होत़े नंदुरबार ते पंढरपूर अशी दैनंदिन बससेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरु असल्याने त्याचाही लाभ झाल्याचे सांगण्यात आले आह़े