शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिर्ण इमारतींबाबत पालिका उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पडक्या व जिर्ण इमारतींबाबत केवळ वृत्तपत्रातून नोटीसा बजावून पालिका नामनिराळी होत आहे. किती घरे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पडक्या व जिर्ण इमारतींबाबत केवळ वृत्तपत्रातून नोटीसा बजावून पालिका नामनिराळी होत आहे. किती घरे व इमारती धोकेदायक आहेत याबाबत कुठलाही सव्र्हे पालिकेने केलेला नाही. शिवाय पालिकेच्या मालकीच्या खाजगी व सार्वजनिक इमारतींचेही स्ट्ररल ऑडीट झाले नसल्याची बाब समोर आली आहे.  एकीकडे शासन व प्रशासन आपत्ती निवारणाअंतर्गत विविध उपाय योजना करीत असतांना पालिका स्तरावर मात्र त्याबाबत सामसूमच आहे. दरवर्षी पडक्या व जिर्ण इमारतींना नोटीसा बजावल्या जातात. यावर्षी तर वृत्तपत्रातून नोटीससंदर्भातील जाहीरात देवून पालिकेने आपले कर्तव्य पार पाडले आहे. किती इमारती बेकायदा आहेत याचीही माहिती बांधकाम विभागाकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. स्ट्ररल ऑडीटसंदर्भात इमारतीची स्थिती पाहून निर्णय घेतला जातो असे बांधकाम अभियंता श्याम करंजे यांनी सांगितले. 400 पेक्षा अधीक घरे डोंगर उतारावर आहेत. अशा ठिकाणी दरडी कोसळणे, पावसाळ्यात माती व मुरूम वाहून येणे व पावसाचे पाणी घरात घुसणे असे प्रकार होतात. यातील 60 टक्के घरे ही अतिक्रमीत आहेत. नंतर ती परवाणगी देवून नियमित करण्यात आली.मोडकळीस आलेल्या इमारती व घरांमध्ये भाडेकरू राहत असतात. कमी भाडय़ात घर राहण्यास मिळत असल्यामुळे भाडेकरू देखील जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी राहत असतात. ऐन पावसाळ्यात अशा लोकांना बाहेर काढणेही घरमालकांना शक्य नसते. त्यामुळे स्वत:चा आणि शेजारी राहणा:या इतर रहिवाशांचा जीव धोक्यात घालून असे भाडेकरू राहत असतात.