शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ३५ दुकानांना पालिकेतर्फे सील; व्यावसायिकांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ...

सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. शहरातील गर्दी थोपविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तळोदा नगरपालिकेने शहरातील मेडिकल, कृषी प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालय, दूध डेअरी, दवाखाने, किराणा दुकाने, भाजीपाला व मांस विक्रेते वगळता इतर सर्व व्यावसायिकांना या कालावधीत दुकाने बंद ठेवण्याची सूचना दिली आहे. प्रत्यक्ष दवंडीनेसुद्धा व्यापाऱ्यांना अवगत केले आहे. या उपरांतही अनेक दुकानदार आतून दूकान सर्रास चालू ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. साहजिकच प्रशासनाने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम सोमवारी सुरू केली. पालिकेच्या पथकाने मेन रोडवरील अशी ३५ दुकाने सील केल्याची कारवाई केली आहे. साहजिकच यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सील केलेली दुकाने लॉकडाऊन उठेपर्यंत उघडण्याचा प्रयत्न केला तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी, मोहन माळी, दिगंबर सूर्यवंशी, नारायण चौधरी, जगदीश सागर, अनिल माळी, सुनील माळी यांच्या पथकाने केली. यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सोमवारी शहरात तोबा गर्दी

शनिवार व रविवारी जनता कर्फ्यु होता. त्यामुळे १४४ कलम लागू असताना सोमवारी ग्रामीण भागातील नागरिकांनी तळोदा शहरात तोबा गर्दी केल्याचे चित्र होते. बँका, दुकानांमध्ये ग्राहकांच्या गर्दीने सामाजिक दुरीचा अक्षरशः फज्जा उडाला होता. वास्तविक व्यावसायिकांनादेखील गर्दीबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते. प्रशासन अन् पोलिसांकडून नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे दुकानदारांचे फावले असल्याचा आरोप आहे. अशीच जर शहरात गर्दी होत असेल तर कोरोनावर मात कशी करता येईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी महसूल, पालिका व पोलीस या तिन्ही यंत्रणांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे; परंतु एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील काही व्यावसायिक बाहेरून शटर व दरवाजे लावून आत ग्राहकांना बोलवून गर्दी जमा करतात. साहजिकच अशा छुप्प्या व्यवसायामुळे गर्दी होत असते. शासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. तरीही त्याचे उल्लंघन करून दुकानदार गर्दी जमवतात. त्यामुळे सोमवारी अशा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनचे बंधन असेपर्यंत दुकाने उघडू नये, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. -राजेंद्र माळी, कार्यालयीन अधीक्षक, नगरपालिका तळोदा.