शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांतर्फे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न महाराष्टÑातील एकमेव संघटना आहे. या संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात इप्टा संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ, तलाठी संघटना, मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटनांनी पाठींबा दिला होता.आंदोलनातील प्रमुख मागण्याजीवन वेतन १ तारखेला होण्याबाबत व वेतनास दिरंगाई करणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित व्हावी, डीसीपीएसधारकांच्या कपातीचे पूर्ण व अचूक अद्ययावत हिशेब व सातव्या वेतन आयोगाची डीसीपीएसधारकांचा थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने अदा करण्यात यावा, १ नोव्हेबर २००५ नंतरच्या सेवेत लागलेल्या शिक्षक व कर्मचाºयांचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना फॅमिली पेन्शन लागू करावी, प्रलंबीत निवड श्रेणीचे व वरिष्ठश्रेणीचे सर्व प्रस्ताव सर्व जिल्हा परिषदांनी विनाविलंब निकाली काढून व यासंबधी तालुकास्तरावर अधिकारांचे विकेंद्रकरण व्हावे, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांची रिक्त पदे शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेमधून तातडीने १०० टक्के भरण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना शासनाने आदेशीत करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांसह सर्व संवर्गातील कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले असून या प्रमुख मागणीसह शासनाने प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मकपणे निर्णय घेऊन प्रश्न सोडवावेत. तसे न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी सहभाग घेतला.