शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक ‘बीपी’चे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यत सर्वाधिक बीपी अर्थात रक्तदाबाचे रुग्ण तर त्या खालोखाल मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यत सर्वाधिक बीपी अर्थात रक्तदाबाचे रुग्ण तर त्या खालोखाल मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत या बाबी समोर आल्या आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम उपयुक्त ठरत असून त्याअंतर्गत ११०० व्यक्तींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यापैकी ७३४ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यातील ८२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यात १८ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी १६ लाखाहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यातआले आहे. यात अक्कलकुवा दोन लाख ३४ हजार, धडगाव दोन लाख २१ हजार, नंदुरबार तीन लाख ४१ हजार, नवापूर दोन लाख ४७ हजार, शहादा तीन लाख ८५ हजार आणि तळोदा तालुक्यातील एक लाख ७० हजार नागरिकांचा समावेश आहे. त्यासाठी तीन लाख ५३ हजार घरांना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील दुर्गम भागातही पथकांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि कोरोनाबाबत दक्षतेच्या सूचना दिल्या.जिल्ह्याने आॅनलाईन नोंदणीतही चांगली कामगिरी केली असून ७० टक्के नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या कामगिरीच्या बाबतीत जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य पथकांनी अनेक अडचणीतून मार्ग काढत कोरोना प्रतिबंधासाठी घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.वेळीच नागरिकांना संदर्भित केल्याने आणि त्यांची कोरोना चाचणी केल्याने संसर्ग बऱ्याच अंशी रोखण्यात प्रशासनाला मदत होणार आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी आरोग्य पथकांना सहकार्य केले.काही गावांनी नागरिकांचे समुपदेशन करून स्वॅब चाचणी शिबिरांचेदेखील संयोजन केले. या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना बाधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाला इतर आजारांच्या मोहिमांबाबतही मदत होणार आहे.

  • सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी सात हजार ६८९ व्यक्तींना रक्तदाब,
  • १५९ कर्करोग,
  • पाच हजार ५८५ जणांना मधुमेह,
  • इतर आजार १,२३१.
  • २९६ व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. त्यांना कोरोना संसगार्पासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
  • २७४ व्यक्तींना ताप, ३४ घसादुखी तर ७२ व्यक्तींमध्ये एसपीओ-२ चे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळले.
  • या सर्वांपैकी ११०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. स्वॅब चाचणीसाठी मोबाईल पथकांचे सहकार्य घेण्यात आले.
  • काही भागात सर्व्हेक्षणासाठी पथकेच आली नसल्याच्या तक्रारीही होत्या. विशेषत: शहरी भागात घर बंद असल्यास पुन्हा पथक आले नाही. काही ठिकाणी एकाच जागी बसून सर्व्हेक्षण झाल्याचेही बोलले गेले. जर शहरी भागात आणखी गांभिर्याने ते झाले असते तर आणखी रुग्ण आढळून आले असते. त्यामुळे सर्व्हेक्षणात काही त्रुटी राहिल्याचेही चित्र आहेच.