शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मोहिदेतर्फे शहादा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

बलवंड येथे प्रजासत्ताक दिवस साजरा नंदुरबार : तालुक्यातील बलवंड येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिवस साजरा ...

बलवंड येथे प्रजासत्ताक दिवस साजरा

नंदुरबार : तालुक्यातील बलवंड येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा भगवानसिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळेत ग्रामपंचायत सदस्य मंगल बापू माळचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच सागर पांडुरंग पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, टोकरतलाव

नंदुरबार : तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात प्रजास्ताक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी इंदिरा महिला सहकारी बँक प्रमुख कविता रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

एस. ए. मिशन खासगी प्राथमिक शाळा, मलोणी

शहादा : तालुक्यातील मलोणी येथील एस. ए. मिशन खासगी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. पी. नाथानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मराठी व इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिकांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी स्टिफन चोपडे, स्मित पाटील, उषा जाधव, मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, सोनाली पाकळे, नितीन गलराह, मृणालिनी भोई, श्वेता गलराह, विद्या मराठे, नीलिमा पटेल, संजय अहिरे आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल सोमवंशी यांनी केले. अर्चना चर्वतूर यांनी आभार मानले.