लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावात तंटा मिटविल्याचा राग येवून जमावाने एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत चाकूने देखील वार करण्यात आल्याची घटना १४ मार्च रोजी चिचोरा, ता.शहादा येथे घडली. आठ जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिचोरा येथील दिलवरसिंग विलसिंग ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वी तंटा मिटविला होता. त्याचा राग धरमसिंग नथा ठाकरे व इतरांना आला होता. त्या रागातून जमावाने दिलवरसिंग ठाकरे यांना गावातच गाठून बेदम मारहाण केली.धरमसिंग यांनी चाकूने कपाळावर वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत दिलवरसिंग ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने धरमसिंग नथा ठाकरे, दिलीप धरमसिंग ठाकरे, ब्रिजलाल देवाजी ठाकरे, रवींद्र ब्रिजलाल ठाकरे, ईश्वर धरमसिंग ठाकरे, कोमा लथा ठाकरे, चंद्रसिंग देवाजी ठाकरे व अशोक विजय ठाकरे सर्व रा.चिचोरा, ता.शहादा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गुलाबसिंग पावरा करीत आहे. दरम्यान, उपचारासाठी संबधीत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जमावाची एकास मारहाण व चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:02 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावात तंटा मिटविल्याचा राग येवून जमावाने एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत चाकूने देखील वार ...
जमावाची एकास मारहाण व चाकू हल्ला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}