प्रकाशा येथे लसीकरणाच्या नियोजनासाठी शिक्षकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:42+5:302021-06-23T04:20:42+5:30

प्रकाशा येथे आतापर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास कोरोना लसीकरण झाले आहे. लसीकरणाची संख्या वाढावी यासाठी येथे पुन्हा शिबिराचे आयोजन करण्यात ...

Meeting of teachers for vaccination planning at Prakasha | प्रकाशा येथे लसीकरणाच्या नियोजनासाठी शिक्षकांची बैठक

प्रकाशा येथे लसीकरणाच्या नियोजनासाठी शिक्षकांची बैठक

प्रकाशा येथे आतापर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास कोरोना लसीकरण झाले आहे. लसीकरणाची संख्या वाढावी यासाठी येथे पुन्हा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे भेट देणार आहेत. प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान हे शिबिर होणार आहे. शिबिराची तयारी पूर्ण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बावस्कर यांनी सांगितले. प्रकाशा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना लस देण्यात येणार आहे.

१३ शाळेतील शिक्षकांची बैठक

या लसीकरण शिबिराच्या नियोजनासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जि.प. शाळेच्या आवारात शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे व केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शिक्षकांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन लस घेणाऱ्या नागरिकांच्या रजिस्ट्रेशनचे नियोजन करण्यात आले.

Web Title: Meeting of teachers for vaccination planning at Prakasha