शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

होळीसंदर्भात गोरंबा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

यंदाच्या होळी सणाबाबत सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील आदिवासींच्या आनंदात थोडे विरजण पडले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ...

यंदाच्या होळी सणाबाबत सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील आदिवासींच्या आनंदात थोडे विरजण पडले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारूड यांच्या निर्गमित अधिसूचनेनुसार निर्बंध लागू केले आहेत. यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर गोरंबा, ता.धडगाव येथे पोलीस निरीक्षक जी.आर. औताडे यांनी भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी औताडे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे होळी सण साजरा करताना जास्त लोकांना गर्दी न करता, सामाजिक अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, बाजार मोठा भरवू नका, आपल्या जीवाची काळजी घेतानाच शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेचे पालन करा, असे मार्गदर्शन केले. बैठकीला माजी सरपंच सुन्या बुल्या पाडवी, माजी सरपंच कांड्या सुन्या पाडवी, माजी सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, पोलीस पाटील पूजा कोमलसिंग पाडवी, कोमलसिंग पाडवी, बामण्या हुण्या पाडवी, हाना हूर्ता पाडवी, बिंदिया वळवी, इंद्या वळवी, धना ईरका वळवी, समाऱ्या भोंग्या वसावे, गोरजी गावीत, दिलवरसिंग वळवी, तेजला वळवी, रमेश वसावे, रमेश वळवी, अमरसिंग किर्ता वळवी, धाकल्या पाडवी, खाअल्या वळवी, दित्या वोरा वसावे, तिज्या भुऱ्या वळवी, गोन्या वळवी, काल्या वळवी, हारसिंग पाडवी, पोलीस हवालदार अभिमन्यू गावीत, जयेश गावीत, पुष्पेंद्र कोळी, ग्रामपंचायत सदस्य हिरा पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड.अशोक पाडवी यांनी केले.