शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे प्रशासन व मौलानांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा. यासाठी शहादा शहरातील सर्व मशिदींचे मौलाना व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली.
बैठकीला प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती पोडभिते, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहूल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ.गिरासे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून नागरिकांची सुरक्षितता व्हावी म्हणून मुस्लीम समाजाने बकरी ईद सण हा साध्या पद्धतीने साजरा करावा. गेल्या चार महिन्यात आलेले विविध सण-उत्सव जसे साध्या पद्धतीने साजरे केले त्याचे पालन आताही व्हावे. गेल्या चार महिन्यात मुस्लीम बांधवांनी मशिदीत न जाता घरी नमाज अदा करीत आहेत. त्याच अनुषंगाने येणाऱ्या सण-उत्सवांनाही घरीच नजाम अदा करावी, असे आवाहन केले. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतलेल्या तृप्ती पोडभिते यांनीही सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाला रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले. या वेळी हाजी अल्ताफ मेमन, प्रा.लियाकत सैयद, डॉ.खलील अहमद, नगरसेवक वसीम तेली, अ‍ॅड.साजिद हाफिज, शमसुद्दीन, साजीद मन्सुरी, मौलवी साजिद जुबेर अन्सारी यांच्यासह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.