पिंगाणे येथे प्रशासन व ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:11+5:302021-01-24T04:15:11+5:30

तालुक्यातील पिंगाणे येथे एकाच घरातील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने लागलीच गावात धाव घेतली. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी ...

Measures taken by the administration and gram panchayat at Pingane | पिंगाणे येथे प्रशासन व ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना

पिंगाणे येथे प्रशासन व ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना

Next

तालुक्यातील पिंगाणे येथे एकाच घरातील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने लागलीच गावात धाव घेतली. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत स्वॅब टेस्टिंगकरिता शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आरोग्य विभागाने गावात पथक पाठवून स्वॅबचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. गावात कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत असून, विविध भागात स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येत आहे.

एकाच घरातील सात व्यक्ती कोविडबाधित आढळून आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील, मंडळ अधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जानेवारी महिन्यात शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जे नागरिक शासकीय नियमांचे पालन करणार नाहीत अशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

या वेळी गावात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी डॉ. चेतन गिरासे यांनी ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहनही केले. संपर्कातील व्यक्तींनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्रास जाणवल्यास स्वॅबचे नमुने द्यावेत. ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात उपाययोजना करून रुग्णसंख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असली तरी अधिकारीवर्गसुद्धा संबंधित गावांना भेटी देऊन युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Web Title: Measures taken by the administration and gram panchayat at Pingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.