शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य लढ्याची साक्ष देणारा तळोद्याचा शहीद स्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहराचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग राहिला असून, त्या इतिहासाची साक्ष शहरात उभारण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहराचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग राहिला असून, त्या इतिहासाची साक्ष शहरात उभारण्यात आलेला हुतात्मा स्तंभ देत आहे. स्वातंत्र्य संग्रामातील सक्रीय असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ शहरवासीयांना प्रेरणादायी ठरत आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणाºया हुतात्म्याचा व कारावास भोगणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ तळोदा शहरात सन १९७३ मध्ये हा हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. तळोदा तालुक्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीकडे जाणाºया मार्गावर हा हुतात्मा स्तंभ आहे. स्तंभाच्या एका बाजूस वरच्या दिशेला अशोकचक्र व खालच्या दिशेला संविधानाची प्रास्ताविका असणारा शिलालेख तर दुसºया बाजूसदेखील वरच्या दिशेला अशोक चक्र व खालच्या दिशेला तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांची व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली संगमरवरी शिळा, अश्या स्वरूपाचा हा स्तंभ आहे. या स्तंभाच्या उभारणीला जवळपास ४५ वर्षे झाली आहेत.
१९७३ साली देशाच्या स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाºया व कारावास भोगणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ केंद्र शासनाच्या वतीने ठिकठिकाणी शिलालेख उभारण्यात आले. त्यापैकी तळोदा शहरातील हा स्तंभ असून, या स्तंभाच्या शिळेवर स्वातंत्रसैनिक संभू मदन पटेल, तळवे, भाऊ भिक्कन पाटील, आमलाड, भगवान गोविंद शेंडे, देवराम रामचंद्र कुकावलकर, भटू मोतीराम कासार, तुकाराम संपत सूर्यवंशी, रामदास पुंजू माळी, दत्तात्रय दगडू भामरे सर्व तळोदा, काशिनाथ नथ्थू पाटील, अभनपूर, नथ्थू लोटन पाटील, प्रतापपूर, बुलाखी कथ्थू पाटील, मोड या स्वातंत्रसैनिकांची नावे कोरण्यात आली आहे. याच वर्षी तळोदा शहरातील या स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांचा वारसांना केंद्र सरकारकडून ताम्रपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

स्वातंत्र्य चळवळीत प्रसिध्द असणारा चिमठाणे येथील खजाना लुटीच्या प्रकारणाचा तळोद्याशीदेखील संबंध असल्याचे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे डॉ.देविदास शेंडे यांनी सांगितले. खजिना लुटीच्या घटनेत प्रमुख असणाऱ्यांपैकी एक शंकर पांडू माळी हे खजिना लूटीनंतर तळोद्यात काही दिवस वास्तव्यास आले होते. तळोद्यातील स्वातंत्र्य सैनिक भगवान गोविंद शेंडे यांच्याकडे दोन ते तीन दिवस मुक्कामाला थांबले. त्यानंतर सातपुडा पर्वत रांगा व नर्मदा नदी पार करत ते मध्यप्रदेशात दाखल झाले. ही हकीकत स्वत: शंकर पांडू माळी यांनी तळोदा येथे झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अधिवेशनात सांगितल्याचे डॉ.शेंडे सांगतात.