शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र, शहरात प्रवेश करणाऱ्या अनेक रस्त्यांवरील बॅरीकेटींग जैसे थे ठेवण्यात आलेले होते.नंदुरबारात मंगळवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. चार दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपले. लॉकडाऊन वाढविले नसल्याने शनिवारी सकाळपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. सर्वच भागातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली. धार्मिक स्थळे बंदच आहेत. ३० जूनपर्यंत रात्रीची अर्थात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय जमावबंदीचा आदेश देखील कायम राहणार आहे. लग्नकार्य आणि अंत्ययात्रा यांच्यातील उपस्थितीची मर्यादाही कायम आहे.शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. बियाणे व खते घेण्यासाठी शेतकरी खाजगी वाहनांनी व ट्रॅक्टर घेवून आलेले होते. दुपारपर्यंत शहरातील चारही भागातील चौफुलींवरील बॅरीकेटींग कायम ठेवण्यात आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.४ दिवस बाजारपेठ बंद राहिली असल्यामुळे रविवार सुट्टीच्या दिवशी देखील बाजारपेठ सुरू राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम होता. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची ड्युटी देखील फिक्स पॉर्इंटवर लावण्यात आलेले होती. त्यामुळे रहदारीचीही फारशी अडचण निर्माण झाली नसल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.एकजण कोरोनामुक्तनंदुरबारातील गाझीनगर भागातील एक महिला कोरोनामुक्त झाल्यांना त्यांना दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात ३७ जण उपचार घेत होते. त्यापैकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने आता ३६ जण येथे उपचार घेत आहेत. आणखी तीन जणांचे दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. अद्याप ८७ अहवालांची प्रतिक्षा आहे.साक्रीनाका ते नवापूर चौफुलीचा रस्ता वाहतुकीसाठी शनिवारीही बंद होता. पाताळगंगा नदीवर लावण्यात आलेले बॅरीकेटींग दुपारपर्यंत कायम होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी धुळेरोड, बायपासमार्गे जावे लागत होते. या भागात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला असल्यामुळे हा भाग आधीच प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील बॅरीकेटींग कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. केवळ बागवान गल्लीपुरते प्रतिबंधीत क्षेत्र असायला हवे असे असतांना मुख्य रस्ता बंद करण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.