शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

पतंगोत्सवासाठी बाजारपेठेत उलाढाल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतंगोत्सव अवघा आठवड्यावर येवून ठेपल्याने पतंगाची बाजारपेठ गजबजली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पतंगोत्सव अवघा आठवड्यावर येवून ठेपल्याने पतंगाची बाजारपेठ गजबजली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर आहेत, मात्र दोरा अर्थात मांजा महागला आहे. दुसरीकडे नायलॉन मांजाची क्रेझ असतांना वाढत्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने हा मांजा विक्रीवर थेट बंदी घातली आहे.नंदुरबारात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. त्याची तयारी महिनाभर आधीपासून केली जाते. सध्या बाजारात ठिकठिकाणी पतंगांची दुकाने थाटण्यात आली आहेत. दोरा अर्थात मांजा बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.यंदा भाव स्थिरपतंगांचे भाव यंदा स्थिर असल्याचे दिसून येत आहे. विविध आकार व प्रकारातील हे पतंग सध्या लक्ष वेधून घेत आहेत. अगदी पाच रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत किंमतीचे पतंग सध्या उपलब्ध आहेत. यंदा काही नवीन प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. प्लॅस्टिकच्या पतंगांमध्ये झालर लावलेली पतंग १०० रुपये नग या प्रमाणे विक्री होत आहे. या पतंगांची साईज अडीच ते तीन फूट एवढी आहे.साचेनुसार देखील पतंग देखील विक्री होत असतात. एका साच्यात २० ते २०० पतंग राहतात. यंदा पतंगांवर हम है हिंदूस्थानी, पबजी, हॅप्यू न्यू ईअर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले तसेच टीव्ही चॅनेलवरील सपना चौधरी, स्पायडरमॅन, रॉकेट, भारतमाता की जय, अपना टाईम आयेगा या पात्रांचे चित्र असलेले पतंगांना मागणी आहे. मॅटल मारबल झालर, त्रिवेणी गोंडारे, कार्टूनची पतंग, चिल पतंग यांना देखील मागणी आहे.मांजाला मागणीपतंग उडविण्यासाठी दोरा अर्थात मांजाला देखील मोठी मागणी आहे. ५०० ते पाच हजार मिटर दोरा घेवून त्याचा मांजा बनविण्यात येतो. साधारणत: दीडशे ते एक हजार रुपये किंमतीचा हा दोरा असतो. दोरा गुंडाळण्यासाठी चक्रीची किंमत २० ते १०० रुपये इतकी असते. दोरा अर्थात मांजा सुरत येथून आणला जातो. घासलेला राहत असल्यामुळे त्याच्यापासून बोटाला ईजा होत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.मांजा बनविण्याची पद्धतनंदुरबारात मांजा बनविण्याची वेगळी पद्धत आहे. लाख, काचेचा चूरा, रंग यांचा वापर करून मांजा तयार केला जातो. एक हजार वार दोरा तयार करण्यासाठी ७० ते ३०० रुपये, अडीच हजार वार १६० ते ६०० रुपये तर पाच हजार वार चे दर ३५० ते हजार रुपये प्रमाणे आहेत.पारंपारिक पद्धतीने मांजा बनविण्यासाठी देखील कारागिरांकडे गर्दी होत आहे. चार ते पाच तास अशा ठिकाणी नंबर लागत नसल्याची स्थिती आहे. शहरात मांजा बनविणारे ठराविक कारागिर आहेत. त्यांच्याकडे पहाटेपासूनच गर्दी होत आहे. दोराचे रिळ घेवून त्यांच्याकडे द्यावा लागतो. कारागिर लाख, काचेचा चुरा, रंग आदी एकत्र करून मांजा तयार करीत असतात. हा मांजा फारसा धोकेदायक राहत नाही.