शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावांना कोरोनाने घेतले कवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर वर्षभरात पहिल्यांदाच कोरोना बाधितांच्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यात हजारी पार करून त्यापुढील एक हजार ...

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर वर्षभरात पहिल्यांदाच कोरोना बाधितांच्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यात हजारी पार करून त्यापुढील एक हजार १५३ आकडा गाठला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असताना दुसरीकडे काही नागरिकांची बेफिकिरी ही कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरत असल्याचे जिल्ह्यातील विदारक चित्र आहे. आता लहानसोबतच मोठ्या गावांमध्येही कोरोना आपले हात-पाय पसरू लागला आहे.

नंदुरबार तालुक्यातील पातोंडा, सावळदे, दहिंदुले, सोंगरीपाडा, काकर्दे, नांदरखेडा, धामडोद, कोठली, खर्दे तलवाडे, भोणे, अक्राळे, समशेरपूर, रुमकीतलाव आदी गावात तर नंदुरबार शहरातील कोकणी हिल, तेली मंगल कार्यालय परिसर, घी बाजार, रेल्वे कॉलनी, जगतापवाडी, बाहेरपुरा, विरलविहार, मंगलभवन जवळ, फकिरा शिंदे नगर, खोडाईमाता रोड, सीतानगर या भागातही बाधित आढळले आहेत.

शहादा तालुक्यात ससदे, असलोद, म्हसावद, भागापूर, निंभोरा, वर्दे टेंभे, डोंगरगाव, सोनावल, करजकुपा, शिरुड दिगर, बिलाडी, चिखली कानडी, सजदे, कोंढावद येथे बाधित आढळले आहेत. शहादा शहरात वडनेरे नगर, हंस नगर, दीनदयाल, सौंदर्यसृष्टी कॉलनी, अंबाजी नगर, मीरा नगर, खोलगल्ली, कृष्णकुंज कॉलनी, तापी रेसिडेन्सी तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा, पळशी, तर पळसून येथे तब्बल ४३ रुग्ण आढळले आहेत.

तळोदा तालुक्यातील रांझणी येथे दोन, राणीपूर येथे १२, प्रतापपूर येथे सहा, मोहिदा, आमलाड तसेच तळोदा तालुक्यातील मरिमाता मंदिर परिसर, काशिनाथ नगर, मराठे चौक, श्रीरामनगर, यमुनाई नगर, दौलत नगरात बाधित आढळले.

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, खडकपाणी, मुळीपाडा, सोरापाडा, मोरांबा, रोजकुंड, खापर येथे बाधित आढळले.

धडगाव शहरासह तालुक्यात रोषमाळ, चुलवद, वडफळ्या, हातधुई, फुलगव्हाण, खुंटामोडी येथेही कोरोनाने पाय पसरले आहेत.