शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

दुर्गम भागातील अनेक गावात अमृत आहार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमधील बालके व मातांना घरपोच अमृत आहार देण्याचे शासनाचे निर्देश असतांना धडगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांमधील बालके व मातांना घरपोच अमृत आहार देण्याचे शासनाचे निर्देश असतांना धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील बहुसंख्य गावांना हा आहार अद्यापपर्यंत पोहोचला नसल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी बैठकीत उपस्थित केली. या वेळी संबंधीत अधिकाऱ्यांची उत्तरे देतांना चांगलीच भंबेरी उडाली होती. येत्या ६ जून पर्यंत या लाभार्थ्यांना आहाराचे वाटप करण्याचा अल्टीमेटम् उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान मागील बैठकीत झालेल्या प्रश्नांवर कुठलीच कार्यवाही केली जात नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांच्च्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या वेळी सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संजय महाजन, नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, तहसीलदार पंकज लोखंडे, अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन म्हस्के, धडगावचे ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सी.के. माळी, चंद्रकांत बोडरे, बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, एस.ए. चौधरी, राजकुमार ऐवळे, अभिजित मोलाणे, किशोर पगारे, योगिता नाईक, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, वीज वितरण कंपनीचे सचिन काळे, डॉ.वंदना पाटील, अभियंता सागर पवार, एस.व्ही. पवार, राहुल गिरासे, ओरसिंग पटले, रंजना कान्होरे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहाय्यक प्रकल्पाधिकारी शैलेश पाटील आदी उपस्थित होते.या वेळी मागील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विभाग निहाय प्रश्न उपस्थित करण्यात आले. तिन्ही तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अंगणवाड्यामधील लहान बालके व मातांच्या अमृत आहाराविषयी चर्चा करण्यात आली. तेव्हा अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यांमधील बहुसंख्य दुर्गम गावांमध्ये आजातागायत घरपोच अमृत आहार पोहचविण्यात आला नसल्याची माहिती बहुतेक सर्वच सदस्यांनी उपस्थित केली होती. वास्तविक कोरोना महामारीमुळे लाभार्थ्यांना घरपोच आहार देण्याचे शासनाचे निर्देश होते. तरीही अजून पावेतो आहार का? पोहोचला नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी अधिकाºयांनी वाहतुकीच्या अडचणीचे थातूर मातूर उत्तरे दिली होती. येत्या चार ते पाच दिवसात आहार वाटप करण्याची सक्त ताकीद उपविभागीय अधिकाºयांनी दिली. याशिवाय या दोन्ही तालुक्यामधील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा प्रश्नही गंभीर असल्याचे सदस्यांनी सांगितले. कुठे उपकेंद्राचे कामे अपूर्ण आहेत तर कुठे रिक्त जागा आहेत. त्यामुळे कुपोषण व मातांचा प्रश्न कसा कमी होईल असा सवालदेखील उपस्थित केला होता. आहाराबाबत सर्व अंगणवाड्यांमध्ये माहिती फलक लावून वाटपाचे नियोजन गावकºयांना सांगा. अक्कलकुवा तालुक्यातील नवानागरमुथा येथील आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपासून हस्तांतरनाच्या प्रतिक्षेत आहे. त्या आधीच दुरवस्था झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचे वाटप करतांना दुर्गम भागाकडून सुरूवात करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. याशिवाय अक्कलकुवा तालुक्यातील गावांमध्ये अजूनही लसीकरण झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी करावे. त्याचबरोबर अनेक दुर्गम गावांमध्ये अजूनही रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. तेथे आरोग्य, रेशन कसे पोहोचाविणार असाही सवाल उपस्थित करून पावसाळ्यापूर्वीच अशा ठिकाणी धान्य तातडीने पोहचवावे. याशिवाय दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रावर आधी डॉक्टरांची नियुक्ती करावी, असेही सदस्यांनी सूचीत केले. त्याचबरोबर अंगणवाड्यांना पुरविले जाणारे गॅससिलिंडरचा पुरवठा नंदुरबारहून होतो. त्यामुळे तालुकास्तरावर ते लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक एजन्सीमार्फत करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.बैठकीत झालेल्या विविध प्रश्नांवरील उपाययोजना, केलेली कार्यवाही पुढील बैठकीत सादर करावी. केवळ कागदी घोडे नाचवू नये अन्यथा अशा अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारावा अशा संतप्त भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. आभार सचिव डॉ.महेंद्र चव्हाण यांनी मानले.अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा किनारी गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे मेडीक्लोअरच्या औषधाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावांमधील गावकºयांना आजही दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे सदस्यांनी सांगितले. तेव्हा संबंधीत गटविकास अधिकाºयांनी हे औषध खरेदी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले आहेत. परंतु ग्रामपंचायती खरेदी करीत नाही. वास्तविक वर्षभर त्याचा पुरवठा होणे अपेक्षित असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींना तत्काळ नोटीसा बाविण्याची सूचना प्रकल्पाधिकाºयांनी दिली. याशिवाय तळोदा, धडगाव तालुक्यातील कुयलीडाबर, पालाबार, केलापाणी, चिरमाळ, सावºयादिगर, तोरणमाळ, तºहावद येथील पाण्याचा प्रश्न तीव्र बनत आहे. ते कायम स्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी थातूर मातूर कार्यवाही केली. जाते. नर्मदा काठांवरील गावांमध्ये पाणी नाही, नदीचे पाणी पितात. असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले होते.