शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसाठी नागरिक तयारी करत आहेत. यात प्रामुख्याने लागणारा आंबा आणि आमरस यांच्या ...

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसाठी नागरिक तयारी करत आहेत. यात प्रामुख्याने लागणारा आंबा आणि आमरस यांच्या टंचाईचे अनुभव जिल्हावासीयांच्या गाठीशी आहेत. परंतु यंदा आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन आल्याने जिल्ह्यातही आंब्याची आवक झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखीन आवक होण्याची शक्यता आहे.

फळांचा राजा असलेला आंबा हा खवय्यांची पहिली पसंती असतो. खास करुन सणावाराला आमरस तयार करण्याची पद्धत आहे. खान्देशात अक्षय तृतीयेला आमरस पुरणपोळीचा बेत केला जातो. पूर्वजांना नैवेद्य देऊन या आमरस पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो. यंदा लाॅकडाऊनमुळे आंबा आवक कमी होणार अशी शक्यता होती. परंतु गुढीपाडव्यापासून जिल्ह्यात आंबा आवक कायम आहे. यामुळे आंबा दर हे सर्वांच्या आवाक्यात असल्याने सकाळी ११ पर्यंतच्या बाजारात खरेदीसाठी झुंबड उडत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारीही आंबा खरेदीसाठी गर्दी होणार असल्याचे गृहित धरुन आंबा विक्री करणारे होलसेल व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांनी तयारी करुन ठेवली असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून उलाढालही वाढणार असल्याचे विक्रेते सांगत आहेेत.

आवक वाढली ग्राहकांचा प्रतिसाद

पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी आंबा व आमरस गरजेचा असल्याने त्याची मुबलक प्रमाणात विक्री होते. कोरोनामुळे जिल्ह्यातील अनेकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे अनेक धार्मिक विधीही त्यांच्या आप्तांना पार पाडता आले नव्हते. यातून अक्षय तृतीयेला या मयतांना श्रद्धांजली वाहून आमरसाचा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे. घागर भरण्याच्या या विधीमुळे आंब्याला मागणी राहणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने यंदाची अक्षय तृतीया भयमुक्त वातावरणात पार पडणार असल्याने नागरिक गोडवा म्हणूनही आमरसाची खरेदी वाढवतील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील स्थानिक बागांमध्ये पिकवला जाणारा आंबाही बऱ्यापैकी बुक करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून आंब्यांची आवक होते. यात गुजरातमधून केसर तर कर्नाटकमधून बदाम, केशर व लंगडा याची आवक होते. आंध्र प्रदेशातून विविध प्रजातीच्या आंब्यांची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोबत रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्यांची आवक होत असल्याचे सांगण्यात आले आहे. नंदुरबार शहरात अनेक ठिकाणी हापूस आंबा आवक झाली असून खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. हापूसची आवकही वाढली असल्याने दर कमी असल्याचे सांगण्यात आले.

यंदा भरपूर आंबे नागरिकांना मिळणार आहेत. भरपूर आवक आहे. गेल्या वर्षासारखी टंचाई निर्माण होण्याची शक्यताच नाही. सर्व व्यापाऱ्यांकडे आंबा आवक झाली आहे. दरही मध्यम असल्याने नागरिकांचा खरेदीला मोठा प्रतिसाद आहे.

- मोहितसिंग राजपूत, होलसेल व्यापारी

सर्वच प्रकारच्या आंब्यांचे दर हे कमी आहेत. यातून गेल्या काही दिवसात खरेदी वाढली होती. अक्षय तृतीयेसाठीही आंबा आवक झाली आहे. नागरिकांना आमरस तयार करण्यासाठी भरपूर आंबे मिळणार आहेत. कमी दरांमुळे सामान्यांना हापूसही खरेदी करता येईल.

- रमेश सिंधी, किरकोळ व्यापारी