शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या रांगेत ‘सोशल डिस्टन्सिंग’ हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील मोलगी येथे बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर बँक सुरू असण्याच्या वेळेत पैसे काढण्यासाठी नागरिकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्यातील मोलगी येथे बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर बँक सुरू असण्याच्या वेळेत पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़ या गर्दीत सोशल डिस्टन्सिंग हरवली असून यावर नियंत्रण येणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत़ याप्रकारामुळे दुर्गम भागातील जनजागृतीचा प्रश्न पुन्हा समोर येत आहे़सातपुड्याच्या अती दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी मोलगी हे एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे़ यामुळे येथील बँकेत मोठ्या संख्येने ग्राहकांची खाती आहे़ ३० किलोमीटरचा परिघ असलेल्या बँकेच्या कार्यक्षेत्रात गाव आणि पाड्यांचा समावेश आहे़ या बँकेच्या शाखेत दर दिवशी पैसे काढणे, जमा करणे या कामांशिवाय आधार नोंदणीसाठी शेकडो ग्राहक येतात़ येथे वीज किंवा नेट सुरू नसल्यास मग या ग्राहकांना बँकेबाहेर थांबण्याची वेळ येते़ परिणामी बँकेपासून २०० मीटरच्या अंतरातील सर्व रस्ते आणि दुकानांचे ओटे हाऊसफुल्ल होतात़ इतरवेळी हे सर्व योग्य असले तरी सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे ही बाब गंभीर आहे़ आजघडीस तोंडाला लावला जाणारा मास्क हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे शासन सांगत आहे़ यामुळे याठिकाणी जिल्हा प्रशासनाने काहीतरी बंदोबस्त करुन गोरगरीब आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे़मोलगी येथे बँक आणि आधार सेंटर हे प्रत्येकी एकच आहे़ या दोन्ही ठिकाणी ३० किलोमीटर अंतरातून आदिवासी बांधव येतात़ वीज आणि इंटरनेट कनेक्शन नसल्यास ते एकाच जागी एकत्र येत आहेत़ यामुळे बँक आणि आधार केंद्रात नियमित विज पुरवठा आणि कनेक्टीव्हीटी दिल्यास या दोन्ही ठिकाणी होणारी गर्दी कमी होणार आहे़ याबाबत गेल्या अनेक वर्षात कोणत्याही प्रकारचे कामकाज झालेले नाही़ गावात वीज खंडीत झाल्यास संपूर्ण दिवसात तो पूर्ववत होत नसल्याचे चित्र आहे़