शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सात पॉझिटिव्ह आल्याने तळोद्यात लॉकडाऊन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील सात जणांचे स्वॅॅब पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ मोठा माळीवाडा, काकाशेठ गल्ली ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील सात जणांचे स्वॅॅब पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ मोठा माळीवाडा, काकाशेठ गल्ली आणि शिवराम नगर येथे हे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने हा सर्व परिसर सील केला असून तळोदा शहर २३ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदा पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार शैलेंंद्र गवते, श्रीकांत लोमटे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे यांनी मोठा माळीवाडा, शिवराम नगर आणि काकाशेठ गल्लीत भेट देत बॅरीकेटींग, व धूरळणी करण्याच्या सूचना केल्या़ठाणे येथून आलेल्या ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपर्कातील १३ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ मयत महिलेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसला तरी तिच्या ४० वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते़ सोमवारीच संबधितास नंदुरबार येथे हलवण्यात आले होते़ दरम्यान १३ पैकी आणखी सात जणांचे स्वॅब रिपोेर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत़ मोठा माळीवाडा येथील चार महिला, १ पुरुष, तर शिवराम नगर आणि काकाशेठ गल्लीतील पुरुषांचा समावेश आहे़ तालुका प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर पालिकेतर्फे तातडीने निर्जंतुकीकरण, धुरळणी आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सुरुवात करण्यात आहे़ सायंकाळी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिन्ही ठिकाणी सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे़तब्बल सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तळोद्यातील लॉकडाऊन हे २३ जून पर्यंत वाढवण्यात आले आहे़ या काळात दवाखाने, मेडीकल, भाजीपाला, किराणा, कृषी सेवा केंद्रे आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत़ सकाळी आठ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्यांना व्यवसायाची मुभा देण्यात आली आहे़कोरोनामुक्त असलेल्या तळोदा शहरात एकाच आठवड्यात आठ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे़ मयत ७२ वर्षीय महिलेच्या संपर्कातील ६ जणांचे स्वॅब रिपोर्ट अद्याप शिल्लक आहे़ यातही नव्याने क्वारंटाईन केलेल्या ११ जणांच्या स्वॅब रिपोर्टची प्रतिक्षा राहणार आहे़ तळोद्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती़ रात्री उशिरापर्यंत मोठा माळीवाडा, शिवराम नगर आणि काकाशेठ गल्लीत सात जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु होता़ तब्बल १७ जणांना आमलाड येथील क्वारंटाईन कक्षात रात्री उशिरा रवाना करण्यात आले़