प्रकाशा-शहादा वाहतूक दुस:या दिवशीही पडली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:20 IST2019-07-31T12:20:20+5:302019-07-31T12:20:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलामुळे प्रवाशांचे हाल सुरुच आहेत़ मंगळवारी सकाळी ...

Light-headed traffic fell on the second day | प्रकाशा-शहादा वाहतूक दुस:या दिवशीही पडली ठप्प

प्रकाशा-शहादा वाहतूक दुस:या दिवशीही पडली ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलामुळे प्रवाशांचे हाल सुरुच आहेत़ मंगळवारी सकाळी येथे वाहन फसल्याने प्रवासी बसेस, चारचाकी वाहने आणि अवजड वाहने अडकून पडली होती़ यातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना शहादा येथे पोहोचण्यास पुन्हा उशिर झाला़  
विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आह़े यांतर्गत प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्ता काँक्रीटीकाण सुरु आह़े यासाठी जुना रस्ता उखडून टाकत त्याठिकाणी मातीचा भराव करुन नवीन रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होत़े परंतू पावसाला सुरुवात झाल्याने रस्त्यावर केलेल्या मातीच्या भरावाचे चिखलात रुपांतर झाले आह़े यामुळे येथून मार्गस्थ होणारे वाहन चिखलात फसून वाहतूक ठप्प होत आह़े चिखलामुळे लहान-मोठी वाहने  घसरुन अपघातही होत आहेत. प्रकाशा ते शहादा दरम्यानच्या अंतरात मनरद, लांबोळा आणि डामरखेडा गावाजवळ चिखल झाल्याने वाहतूकीवर परिणाम झत्तला आह़े प्रकाशासह मार्गावरील गावांमधून शहादा येथे शिक्षणासाठी जाणा:या विद्याथ्र्याना या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आह़े सोमवारी सुमारे चार तासांर्पयत विद्यार्थी बसेसमध्ये अडकून पडले होत़े मंगळवारी सकाळीही हीच स्थिती होती़ सकाळपासून वेळोवेळी वाहतूक बंद पडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले होत़े 
ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी सकाळी येथे आंदोलनाचा प्रयत्न केला होता़ यावेळी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी पालकांची समजूत काढली होती़ दरम्यान संबधित ठेकेदाराने दोन दिवसात रस्ता दुरुस्ती करुन देण्याची हमी दिल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले होत़े परंतू याच्या काही वेळानंतर पुन्हा एक वाहन फसल्याने वाहतूकीवर परिणाम झाला़ पावसाची रिपरिप कायम असल्याने याठिकाणी वाहने फसण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आह़े रात्रीच्यावेळी येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आह़े 

चिखलामुळे मार्गावरुन धावणा:या बसेसच्या मार्गातही बदल करण्याचा निर्णय अक्कलकुवा आणि शहादा आगाराने घेतला आह़े अक्कलकुवा ते शहादा दरम्यान धावणा:या बसेस शहादा बोरद मार्गाने तळोद्याकडे जात आहेत़ यातील बोरद ते परिवर्धे दरम्यानचा रस्ताही खराब असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत़ प्रकाशा येथून काथर्दे मार्गाने खाजगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहाद्याकडे वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 

अडकलेले पीकअप वाहन काढण्यासाठी दुस:या वाहनाला टोचण करण्यात आले होत़े परंतू दोन्ही वाहने फसल्याने वाहतूक कोंडी झाली़ प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रावर आंदोलनाच्या पवित्र्यातील पालक, पोलीस निरीक्षक शुक्ला आणि संबधित ठेकेदार यांच्यात चर्चा झाली़ यावेळी हेमलता शितोळे तंटामुक्तीचे अध्यक्ष किशोर चौधरी व हरी पाटील यांनी पालकांची बाजू मांडली़ 
 

Web Title: Light-headed traffic fell on the second day