शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी  जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी  जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील   स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला. स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने सलग तिसºया दिवशी ही कारवाई करण्यात आली असून तीन दिवसात पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. चिंचोली येथील संजय शालीग्राम घुगे यांच्या स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रारी वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार  जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच पुरवठा तपासणी अधिकाºयांनी तपासणी केली. त्या वेळी तेथे  आवश्यक ते फलक नसणे, आवश्यक दस्तावेज नसणे, नमुने नसणे शिधापत्रिकेवर धान्य वितरणाची नोंद नाही,  ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य वितरण करणे, धान्य साठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले.  या दुकानाचे नियतन नजीकच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्याचेही आदेश दिले आहे.