शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

पेन्शनच्या पैशातून त्यांनी बांधले वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:59 AM

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंदीर, मशीद आणि शाळांच्या बांधकामासाठी अनेक दाते पुढे येत असतांना ख:या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंदीर, मशीद आणि शाळांच्या बांधकामासाठी अनेक दाते पुढे येत असतांना ख:या अर्थाने विचार आणि संस्काराचे केंद्र असलेल्या ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यासाठी देखील दाता मिळणे दुरापस्त झाले आहे. अशा स्थितीत पेन्शनच्या निधीतून ग्रंथालयाची इमारत बांधण्याचा भालेर, ता.नंदुरबार येथील निवृत्त पोस्टमास्तर बाळू काशिनाथ कुवर यांचा उपक्रम सर्वत्र कौतूकाचा ठरला आहे.भालेर येथे श्री गुरुदत्त सार्वजनिक वाचनालय गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे. याच वाचनालयाचे संस्थापक बाळू काशिनाथ कुवर हे पोस्ट आणि दुरसंचार खात्यात नोकरीला होते. पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले असून निवृत्तीनंतर त्यांनी आपले आयुष्य समाज कार्याला वाहिले आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी गावोगावी फिरून बेलची रोपं वाटपाचा उपक्रमातून ते चर्चेत आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी वाचनालयाची इमारत बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी आर.आर.फाऊंडेशनकडे निधीची मागणीही केली. फाऊंडेशनने निधीला मंजुरी दिली असली तरी ती अपुर्ण पडल्याने इमारत बांधावी कशी असा प्रश्न पडला होता. त्यामुळे कुवर यांनी आपल्या पेन्शनचा आलेला सर्व पैसा वाचनालयाच्या इमारतीसाठी दान केला आणि इमारत पुर्ण केली. सुमारे 1300 चौरसफूट जागेत ही इमारत आहे. या इमारतीसाठी एकुण 13 लाख रुपये खर्च आला आहे. त्यासाठी आर.आर.फाऊंडेशनने केवळ सहा लाखाचा निधी दिला आहे. उर्वरित सात लाख रुपयांचा खर्च कुवर यांनी केला आहे. हे वाचनालय जिल्ह्यातील स्वत:ची इमारत असलेले ग्रामिण भागातील पहिले वाचनालय ठरले आहे. या वाचनालयात एकुण पाच हजार पुस्तके असून स्वतंत्र इमारत झाल्यानंतर या ठिकाणी बाल विभाग, महिला विभाग स्वतंत्र करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व अभ्यासाचे केंद्र येथे स्थापन करण्यात येणार आहे. अतिशय टुमदार व देखणी इमारत या वाचनालयाची उभी झाली असून ते  ग्रंथालय क्षेत्रातील एक आकर्षण ठरले आहे.

ग्रंथालय हे ख:या अर्थाने ज्ञानमंदीर असते त्यामुळे श्री गुरुदत्त वाचनालयाच्या उभारणीसाठी आपले सुरुवातीपासून प्रय} होते. वाचनालयाचा ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत होता. त्यामुळे वाचनालयाची स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी आपले प्रय} होते. अनेक प्रय}ानंतर जागेची उपलब्धता झाली, निधीसाठी प्रशासनाचे सहकार्य लाभले, पण पुरेसा निधी न मिळाल्याने अखेर पेन्शनचा पैसा या चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश मिळाले. इमारत पाहुण खूप आनंद होत असल्याचे बाळू कुवर यांनी सांगितले.