वर्षभरात १२ लाचखोरांना सामान्यांनी शिकवला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:32 IST2019-12-11T11:32:34+5:302019-12-11T11:32:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदाच्या वर्षात तब्बल १२ लाचखोर ‘लोकसेवकां’वर कारवाई केली असून आणखी दोघांना ...

Lessons taught by 4 bribes throughout the year | वर्षभरात १२ लाचखोरांना सामान्यांनी शिकवला धडा

वर्षभरात १२ लाचखोरांना सामान्यांनी शिकवला धडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदाच्या वर्षात तब्बल १२ लाचखोर ‘लोकसेवकां’वर कारवाई केली असून आणखी दोघांना लाच भोवण्याची शक्यता आहे़ गेल्या काही वर्षात लाच देण्याबाबत सामान्यांमध्ये जागृती निर्माण झाल्याने लाच मागणाऱ्या १२ लाचखोरांना सामान्य माणसांनीच एसीबीकडे तक्रार देत धडा शिकवला आहे़
जिल्ह्यात २००८ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे़ उपअधिक्षक दर्जाचे एक अधिकारी, २ पोलीस निरीक्षक आणि आठ पोलीस कॉन्स्टेबल अशा पुरेशा संख्याबळावर सुरु असलेल्या कार्यालयातून गेल्या काही वर्षात जनजागृती झाल्याने लाचेची मागणी करुन कामे अडवणाऱ्यांच्या तक्रारी वेळोवेळी देण्यात येत आहेत़ यातून गेल्या काही वर्षात लाचखोरांवर एसीबीच्या पथकाकडून धडक कारवाई करुन रंगेहात पकडले गेले आहेत़ वर्षभरात या पथकांनी केलेल्या कारवाईत पोलीसांचा क्रमांक अग्रभागी असून त्याखालोखाल वीज कंपनी, आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि राज्य परीवहन महामंडळातील कर्मचाºयांचा समावेश आहे़ लाच घेणारे सर्वच कर्मचारी हे चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याने या कारवाईमुळे त्यांच्या नोकरीतील ‘रेकॉर्ड’वर परिणाम झाला आहे़ असे असतानाही जिल्ह्यातील काही कार्यालयांमधून लाचेची मागणी करण्याचे प्रकार थांबलेले नसल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे़
अद्याप वर्ष पूर्ण होण्यास काही दिवसांचा अवधी असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़ यातील दोन प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़

४यंदाच्या वर्षात अक्कलकुवा येथील वाहतूक पोलीस कर्मचारी, मोलगी येथील वाहतूक पोलीस डामरखेडा ता़ शहादा येथील मुख्याध्यापक, तोरणमाळ येथील वैद्यकीय अधिकारी, उपनगर पोलीस ठाण्याचा पोलीस कॉन्स्टेबल, आदिवासी विकास महामंडळातील दोघे लिपिकवर्गीय कर्मचारी, तळोदा पोलीस ठाण्यात १ हवालदार, विज वितरण कंपनीतील दोघे कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातील १ निरीक्षक दर्जाचा कर्मचारी असे ११ तर सोमवारी तळोदा पंचायत समितीतून एका लिपिकास एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती़ बाराही लाचखोरांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदारांनी थेट नंदुरबार येथील जयचंद नगरातील एसीबीच्या कार्यालयात संपर्क करुन तक्रारी केल्यानंतर तपास सुरु झाला होता़ यातून लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे़
४नंदुरबार जिल्ह्यातून लाचखोरी करणाºया तिघांवर आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना न्यायालयात सेवेतून बडतर्फ करत शिक्षा सुनावली होती़ यात दोन आरोपींना ३ वर्ष सक्त मजुरी व दंड तसेच १ वर्ष सक्तमजुरी व दंड सुनावला होता़ एका प्रकारणात आरोप सिद्ध झाल्यानंतर एकाला थेट सात वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़ या शिक्षांनंतरही जिल्ह्यातील लाचखोरी थांबवलेली नसून अद्यापही दोन जणांविरोधातील तक्रारीचा पाठपुरावा एसीबीने सुरु ठेवला आहे़

केवळ लाचखोरांविरोधात नव्हे तर यंदा शासकीय पदावर असताना पदाचा गैरवापर करत अमाप संपत्ती गोळा करणाºया जिल्ह्यातील दोघांच्या मागावरही एसीबीचे पथक असल्याची माहिती समोर आली आहे़ हे दोघे कोण हे अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते़ तसेच जिल्ह्यात गाजलेल्या जिल्हा उद्योग केंंद्रातील भ्रष्टाचाराचा तपासही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आला होता़ दीड वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाचा तपासही अंतिम टप्प्यात आला असून कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे़

Web Title: Lessons taught by 4 bribes throughout the year