शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या हल्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच दिवसात बिबट्याने केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या हल्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच दिवसात बिबट्याने केलेल्या तिसऱ्या हल्ल्यात शेळी फस्त केल्याची घटना घडली आहे. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून, तत्काळ त्या बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तळोदा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास भाजापाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार यांच्या काजीपुर-तलावडी शिवारातील शेतातील झोपडी जवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला करून बाजुच्या शेतात ओढून नेले. शेतातील रखवालदार सुनील वसावे यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले, आपल्या कुटूंबातील सदस्यांना झोपडीत सुरक्षित बंद करून त्यांना तात्काळ शेत मालकास भ्रमणध्वनीद्वारे आपबीती कळविले. शेतमालक वनविभागाचे कर्मचाºयांची घटनास्थळी येऊन पाहणी केली. आठवड्याभरापूर्वीदेखील पहाटेच्या सुमारास याच ठिकाणाहून बिबट्याने एक शेळी फस्त केली होती.दोन दिवसापूर्वीदेखील धानोरा शिवारातील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बापू पाटील यांच्या शेतात उदमांजरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली तर गौरव वाणी यांच्या शेतातील पाळीव कुत्रा फस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. त्याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी आला असून, पुन्हा एका पाळीव कुत्र्याला त्या बिबट्याने ओढून नेले. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. रात्रीच्या सुमारास दिसणारा बिबट्या दिवसा ढवळ्या हल्ले चढवत असल्याने शेतकरी, शेतमजूर व रखवालदार चांगलेच भयभीत झाले आहेत. वनविभागाने केवळ पाहणी करून कागदे रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष पिंजरा लावून त्या बिबट्यास जेरबंद करावे अथवा जीवितहानी होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.