शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

‘बिटक्या’ने तिघांच्या मदतीने केलेली चोरी एलसीबीने केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एक लाखाचे बियाणे चोरी करणाऱ्या बिटक्या, चेला, मडरी व लखन यांना अटक करून त्यांच्याकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एक लाखाचे बियाणे चोरी करणाऱ्या बिटक्या, चेला, मडरी व लखन यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला यश आले आहे. या तिघांकडून शहरातील आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.अनिकेत उर्फ बिटक्या रवींद्र टिळंगे (२०), बाबा उर्फ लखन किशोर घासीकर (२७) व काल्या उर्फ चेला बिहारी गारुंगे (२२), मडरी ज्ञानदेव घासीकर रा.कंजरवाडा, नंदुरबार असे अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडावूनमध्ये विक्रीसाठी ठेवलेले १ लाख १६ हजार रुपये किंमतीचे हायब्रिड सिड लिमिटेड कंपनीचे कपासीचे बियाणे चोरीची घटना घडली होती. १ ते ४ जून दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज होता. चोरट्यांनी गोडावूनचे शटर उचकवून ही चोरी केली होती.नंदुरबारात घडलेल्या या घटनेची पोलीस अधीक्षकांनी दखल घेवून एलसीबीला तपसाच्या सुचना दिल्या होत्या. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी आपल्या खबरींमार्फत माहिती काढली असता कंजरवाड्यातीलच काही जणांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता बिटक्या हा या चोरीचा मुळ सूत्रधार असल्याचे पुढे आले. किशोर नवले यांनी पथकातील काही जणांना साध्या वेशात वस्तीत पाठविले असता बिटक्या हा कंजरवाड्यातील गोडावूनच्या बाजुला असलेल्या पडक्या घराच्या जवळ बसलेला आढळला. त्याला घेरून ताब्यात घेतले. एलसीबीला नेले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.त्याने साथीदार मडरी ज्ञानदेव घासीकर, लखन घाशीकर, चेला गारुंगे यांच्यासोबत ही चोरी केल्याचे सांगितले. चोरलेला एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल मडरी घासीकर यांच्या घराच्या आडोशाला झाकुन लपवून ठेवलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली असता ९७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून फरार झालेला मडरी घासीकर याला देखील लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.