शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तार चोरीच्या गुन्ह्यातील दोघे एलसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पवन ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार चोरुन विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या  दोघा गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पवन ऊर्जा प्रकल्पातून तांब्याची तार चोरुन विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या  दोघा गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल़े गुरुवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईत दोघांकडून पथकाने अडीच लाख रुपयांचा जप्त केला आह़े  इमरान शिराज खाटीक व गणेश तुकाराम धनगर दोन्ही रा़ शनिमांडळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ नंदुरबार तालुक्यातील सुझलॉन या पवन ऊर्जा प्रकल्पातून चोरलेली तांब्याची तार एमएच 03-एएफ-8243 या वाहनाने दोंडाईचा येथे दोघे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने वावद ता़ नंदुरबार येथे दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावर सापळा रचून इमरान व गणेश या दोघांना ताब्यात घैतल़े वाहन तपासणी दरम्यान डिक्कीत 41 हजार 312 रुपयांची 51 किलो तांब्याची तार ताब्यात घेण्यात आली़ 2 लाख रुपयांच्या वाहनासह दोघांकडून ताब्यात घेतलेली तार असा एकूण 2 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला़ दोघांची चौकशी केली असता, ही तार शेखर श्रीराम माळी रा़ शनिमांडळ याने चोरुन आणून दिल्याची कबुली दोघांकडून देण्यात आली आह़े दोघांना तालुका पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले असून फरार शेखर माळी याचा पोलीसांकडून शोध घेतला जात आह़े येत्या काळात तार चोरीचे मोठे गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पथकाने वर्तवला आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे यांनी केली़