शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यापासून नंदुरबारातही कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे येथील कोविड तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण आणि जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे येथील कोविड तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण आणि जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबारातही पुढील आठवड्यापासून कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू होत आहे. त्यासाठी लागणारी टूनॅट हे उपकरण देखील रविवारपर्यंत येथे पोहचणार आहे. या बाबीला खासदार डॉ.हिना गावीत यांनीही दुजोरा दिला.नंदुरबारात कोविड तपासणी प्रयोगशाळा यापूर्वीच मंजुर आहे. परंतु ती सुरू करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री येथे उपलब्ध नव्हती. त्याकरीता पाठपुरावा सुरू होता. गेल्या चार दिवसात धुळे येथील प्रयोगशाळेतून जिल्ह्यातील एकही स्वॅब तपासणी झाली नाही. त्यामुळे ओरड झाली. संशयीत रुग्णांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांचे देखील स्वॅब घेतले गेले नाहीत. त्यामुळे नंदुरबारात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.नंदुरबारला प्रयोगशाळा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोविड तपासणीसाठी लागणारे उपकरण अर्थात टूनॅट मशीन हे नंदुरबारसाठी रवाना झाले आहे. रविवारपर्यंत हे मशीन येथे उपलब्ध होईल. प्राथमिक तयारीनंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊन मंगळवार किंवा बुधवारपासून येथे कोविड तपासणीला सुरुवात होणार आहे.याबाबत खासदार डॉ.हिना गावीत यांनी देखील त्याला दुजोरा दिला असून लवकरात लवकर स्वॅब तपासणी सुरू व्हावी यासाठी संबधितांना सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे धुळे किंवा इतर ठिकाणी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याची गरज राहणार नसल्याचे सांगण्यात आले.