शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खैरवे-भडगाव येथे ४३ जण पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने पथक दाखल करून उपाययोजना सुरू केल्या असून, खैरवे व भडगाव ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र ...

ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने पथक दाखल करून उपाययोजना सुरू केल्या असून, खैरवे व भडगाव ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. संपूर्ण गाव बॅरेकेड लावून बंद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपले आरोग्य आपण सांभाळा, शासनाच्या नियमावलीचे पालन करा, असे आवाहन प्रशासन व पं.स. सदस्या चंदनबाई पानपाटील यांनी केले आहे. खैरवे व भडगाव या छोट्याशा गावांमध्येही कोरोनाने रौद्ररूप धारण करीत प्रवेश केला आहे. त्यात ४३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून औषधोपचार करण्यात येत आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या लोकांचे घरातच विलगीकरण करण्यात आले असून, काही लोकांना शहादा व नंदुरबार येथील कोविड सेंटरला पाठविण्यात आले आहे. गावात औषध फवारणी करण्यात आली असून, प्रत्येकाने तोंडाला मास्क, वेळोवेळी हात धुणे, गर्दी न करणे, असे निर्बंध लावले आहेत. या सर्व परिस्थितीवर सरपंच शारदाबाई निकुंबे, उपसरपंच रमणबाई गिरासे, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, ग्रामसेविका कल्पना धनगर, आरोग्य सेविका अलका मराठे, आरोग्य सहायक परदेशी, पोलीस पाटील धनराज पानपाटील, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी महेश ठाकरे, नितेश मोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र पानपाटील आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

माझे पती व मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहोत. उर्वरित ग्रामस्थांनी गावातच गुरुवारी शिबिर घेऊन रॅपिड अँटिजन टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून आरोग्य विभागाला औषधोपचार करण्यास मदत होईल व गाव कोरोनामुक्त करू. ग्रामस्थांनी भीती बाळगू नये, प्रशासनास सहकार्य करावे.

-चंदनबाई पानपाटील, पं.स. सदस्या, खैरवे-भडगाव, ता.शहादा.

संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे व तीन दिवस गाव पूर्णतः बंद करण्यात आले आहे. गावात बॅरेकेड लावून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असले तरी ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी.

-कल्पना धनगर, ग्रामसेविका, खैरवे-भडगाव, ता.शहादा.