शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा गावाजवळील गुजरात राज्याच्या सीमेवर कडक पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजरात राज्याकडून येणारी वाहने लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रकाशा गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजरात राज्याकडून येणारी वाहने लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रकाशा गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात सीमेलगत पोलीस, महसूल विभाग व प्रकाशा ग्रामपंचायतीने बॅरिकेटींग लावून सील केले आहे. त्यामुळे याठिकाणी शुकशुकाट पसरला आहे.सविस्तर वृत्त असे की, कोरोना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आला आहे. योग्यवेळी दक्षता घेतली नाही किंवा सतर्कता ठेवली नाही तर केव्हाही आपल्या जिल्ह्यात संसर्ग वाढू शकतो, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा येथील बैठकीत सांगितले होते. या बैठकीनंतर गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यातच प्रकाशा येथील तळोदा चौकीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गुजरात राज्य सुरू होते. गुजरात राज्यातून प्रवासी किंवा इतर वाहने येऊ नये यासाठी शुक्रवारपासूनच प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभागानेही सीमा सील केली आहे. यामुळे दुचाकीधारक, मोठी वाहने यांचा प्रवेश बंद झाला असून प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी, प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी हे याठिकाणी लक्ष ठेवून आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणतेही वाहन महाराष्ट्र हद्दीत आले नाही. प्रकाशाकडून नंदुरबारकडे येताना तापी नदीचा पूल पार केल्यावर उजव्या हातालाच गुजरातकडे एक रस्ता जातो. याठिकाणीही येणाºया-जाणाºया वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.प्रकाशा गावात इतर वाहने परस्पर वस्तू विक्रीसाठी येत होते. त्यामध्ये कांदा, बटाटे, टरबूज आदींचा समावेश होता. मात्र त्यांनाही आता प्रकाशा ग्रामपंचायतीने नकार दिला आहे.प्रकाशा हे गाव तालुक्यात मोठे असून येथे मोठ्या प्रमाणावर मजूरवर्ग वास्तव्यास आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, सर्वत्र बंद असल्याने गरीब व गरजूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पाच रुपयात पोटभर जेवण देणारे शासनाचे शिवभोजन थाळी केंद्र प्रकाशा येथे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.