शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ-खडकी घाटात जीप दरीत कोसळली, सहा मजूर ठार, १० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

शहादा/ब्राम्हणपुरी : मजुरांना घेऊन जाणारी जीपगाडी ५०० फूट दरीत कोसळून सहाजण ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ...

शहादा/ब्राम्हणपुरी : मजुरांना घेऊन जाणारी जीपगाडी ५०० फूट दरीत कोसळून सहाजण ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता तोरणमाळ येथील खडकी पॅाईंटनजीक घडली. मयतांमध्ये पाच महिला आहेत. सर्वजण खडकी, ता.धडगाव येथील रहिवासी आहेत.

मयतांमध्ये चिमा धीसा नाईक (३५), बाईजीबाई रेलसिंग नाईक (३८), कुचलीबाई रेलसिंग नाईक (१८), रिमाबाई रायसिंग नाईक (९), सेकडीबाई सायसिंग नाईक (४५), रिंगाटीबाई चिमल्या नाईक (२५) सर्व रा. खडकी, ता.धडगाव तर जखमींमध्ये जखमींमध्ये सुनिता सायिसंग नाईक, भायसिंग सायसिंग नाईक, गोखऱ्या वाहाऱ्या नाईक, बयाना घनश्याम नाईक, गणेश रेवज्या रावताळे, गोखऱ्या वनश्या नाईक, रायमल रेवल्या नाईक, चोमा गिसा नाईक, रेलसिंग जेलसिंग नाईक, आमश्या गोखऱ्या नाईक सर्व रा.खडकी, ता.धडगाव यांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये मजुरीसाठी हे सर्वजण खडकी येथून जीपगाडीने (क्रमांक एमएच १५-एएस २८९३) तोरणमाळमार्गे गुजरातमधील रोस्का येथे जात होते. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे वाहन खडकी घाटातून तोरणमाळ पठाराकडे येत असतांना पठारापासून अवघ्या ३०० मिटर अंतरावर त्यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहन मागे घसरू लागले. त्यावेळी काहींनी वाहनातून उड्या मारल्या, परंतु आत बसलेल्या महिला वाहनासह थेट ५०० फूट दरीत कोसळल्या. त्यामुळे गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना खोल दरीतून झोळीकरून वर आणण्यात आले. तोरणमाळ आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी त्याची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनी मयतांच्या वारसांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच पाच लाख मदतीची घोषणा केली.