शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

स्टॅच्यू ऑफ युनिटीवर दिवाळीपूर्वीच जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:14 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर लख्ख रोशणाईने उजाळला असून येथे दिवाळीपूर्वीची दिवाळी आली आहे. त्याला निमित्त आहे या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पर्यटन प्रकल्पाच्या उद्‌घाटनाचे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून गुजरातमधील केवडीया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी व सरदार सरोवर प्रकल्पाच्या परिसरात शुक्रवार व शनिवारी विविध पर्यटन प्रकल्पांचे उद्‌घाटन होत आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथे आले आहेत. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी व राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. आज दिवसभरात त्यांनी एकता माॅल, चिल्ड्रेन न्यूट्रेशन पार्क, कॅक्टस गार्डन, आरोग्य वन, युनिटी ग्लो गार्डन आणि सरदार पटेल जंगल सफारी तसेच क्रूझचे उद्‌घाटन केले. जंगल सफारी ही जगातील लक्षवेधी सफारी असून ३७५ एकर क्षेत्रात त्याचा विस्तार आहे. याठिकाणी ११०० जातीचे पक्षी तसेच १०० प्रजातीचे प्राणी आहेत. चिल्ड्रेन पार्क हेदेखील अद्ययावत टेक्नाॅलाॅजीच्या धर्तीवर जगातील पहिले पार्क साकारले आहे. कॅक्टस गार्डनमध्ये सुमारे साडेचारशे प्रकारची कॅक्टस आहेत. आरोग्य वन १७ एकरमध्ये विस्तारले असून त्यात ३८० वनौषधी, वेलनेस सेंटर, योगा, डिजीटल इन्फाॅर्मेशन सेंटर यासह विविध अॅक्टीव्हीज आहेत. ज्या क्रूझचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले त्याची आसन क्षमता २०० असून ते नर्मदेच्या पाण्यात साडेसहा किलोमीटरची ४० मिनिटांची पर्यटकांना सफारी करणार आहे.आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याठिकाणी पर्यटकांसाठी विविध १७ प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहेत. त्यात जगातील पहिले सी-प्लेनचे उद्‌घाटनही शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होईल.एकूणच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ झाले असून याठिकाणी अनेक प्रकल्प जगातील पहिले व मोठे ठरत आहेत. या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून लख्ख रोशणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी डिजीटल रोशणाईने हा परिसर लख्ख उजाळला आहे.

११ गावात ‘बंद’पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने केवडीया परिसरातील ११ गावांनी बंद पाळला आहे. कोरोना वाढण्याच्या शक्यतेने या गावांनी सामूहिकपणे राष्ट्रपतींना पत्र देऊन बंद ठेवण्याचा संयुक्त ठराव केला आहे. ग्रामसभेच्या परवानगीविना कुणीही या गावात प्रवेश करू नये, असा ठराव त्यांनी केला आहे. त्यात कोठी, भुंगलिया, वागडीया, केवडीया गाम, लिमडी, नवागाव, गोरा, वसंतपरा, पिप्रीया, मोठा पिप्रीया, इंद्रवर्ष या गावांचा समावेश आहे.