शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीत गेल्या अडीच महिन्यापासून कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीत गेल्या अडीच महिन्यापासून कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत़ बाहेरील राज्यात किंंवा जवळच्या बाजारात कांदा घेऊन जाणे शक्य न झाल्याने अनेकांनी कांदा फेकून देत त्याची विल्हेवाट लावली आहे़नंदुरबार बाजार समिती यापूर्वी कांदा हा भाजीपाला पिकांमध्ये खरेदी करण्यात येत होता़ परंतू कांदा अनुदान योजना लागू झाल्यानंतर परवानाधारक व्यापारी नसल्याने अडचणी येत होत्या़ यातून कांदा लिलाव करुन त्याची विक्री करणे शक्य नसल्याने आडतदारांनी कांदा खरेदी बंद केली आहे़ दरम्यानच्या काळात बाजार समितीचे मार्केट यार्ड हे रात्री सुरु झाल्याने ग्रामीण भागातून सुविधा नसलेले शेतकरी येणे बंद होवून कांदा आवक बंद झाली आहे़गरजू आणि छोटे शेतकरी रात्री किंवा दिवसा आडतदारांना भाजीपाला बाजारात कांदा विक्री करुन जात आहेत़ यातून मंगळवारी कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे़ वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याने अनेकांनी कांदा फेकून दिला आहे़ शनिमांडळ शिवारातील अनेक शेतांमध्ये कांदा चाळ व्यतिरिक्त कांदा रस्त्यावर तसेच शेतात सोडून देण्यात आला आहे़ हा कांदा गुरे आणि शेळ्या मेंढ्या यांना चारण्यात येत आहे़ नंदुरबार बाजार समितीत परवानाधारक कांदा खरेदीदार नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत़ आडतदार अनुदान देऊ शकत नाहीत़ लगतचा दोंडाईचा आणि धुळे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमी बंद चालू अवस्थेत असल्याने नुकसान वाढले आहे़जिल्हाधिकाऱ्यांनी कापूस साठा करुन ठेवणाºया शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत़ यातून कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ याच धर्तीवर कांदा उत्पादक शेतकºयांनाही दिलासा देऊन पडून असलेला कांदा शासनाने खरेदी करण्यासाठी व्यापारी नियुक्त करण्याची मागणी आहे़