दुभाजकातील लोखंडी सळ्या ठरताहेत अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:14 IST2019-12-28T12:14:21+5:302019-12-28T12:14:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बसस्थानकाबाहेरील रस्त्यावरील दुभाजक तुटून लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ...

An invitation to an accident in the form of an iron bar in the interpreter | दुभाजकातील लोखंडी सळ्या ठरताहेत अपघाताला आमंत्रण

दुभाजकातील लोखंडी सळ्या ठरताहेत अपघाताला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील बसस्थानकाबाहेरील रस्त्यावरील दुभाजक तुटून लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेने हे दुभाजक दुरुस्त करण्याची गरज आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने बसस्थानकाबाहेर रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या दुभाजकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते पुढील भागात तुटले असून दुभाजकातून लोखंडी सळ्या बाहेर येत आहेत. बसस्थानकाबाहेरचा रस्ता असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. दुभाजकातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनाचा अपघात किंवा पादचाऱ्याला दुखापत होण्याआधी पालिका प्रशासनाने लक्ष घालून दुभाजकाची दुरुस्ती करावी किंवा लोखंडी सळ्या तोडून बाहेर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: An invitation to an accident in the form of an iron bar in the interpreter